
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे जी तुमच्या मनाला देखील भावेल..
मुंबई- लॉकडाऊनच्या या काळात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या वेळेचा सदुपयोग करत आहेत..तसंच या वेळेत ते जे काही करत आहेत त्याचे अपडेट्स ते चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर आवर्जुन शेअर करत आहेत जेणेकरुन या तणावपूर्ण वातावरणात ते थोडे रिलॅक्स होऊ शकतील..बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे जी तुमच्या मनाला देखील भावेल..
हे ही वाचा: सलमान खान लॉकडाऊनमध्ये खातोय घोड्यासोबत चारा
अभिनेत्री क्रितीने एक व्हिडिओ शेअर केला आहे..या व्हिडिओमध्ये तिची बहीण आणि गायिका नुपूर सॅनन तिच्या घरात बसून एक कविता सादर करताना दिसतेय..या कवितेची खासियत अशी की आहे की स्वतः नुपूरने ही कविता लिहीली आहे..कवितेचं शिर्षक 'तो तुम इसलिए' असं आहे..
क्रितीने बहीणीचा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, 'आपण सध्याच्या या धावपळीच्या जगात प्रेमावरुन अनेक प्रश्न उपस्थित करतो..जिथे ख-या प्रेमाचा फार अभाव आहे..सादर करत आहे नुपूरद्वारे लिहिलेली एक मस्त कविता..ही माझ्या मनाला खूपंच भावली..आशा करते की तुम्हीही ही ऐकल्यावर भावूक व्हाल. नुपूर तु एवढी मोठी कधी झालीस ?'
चाहत्यांना नुपूरची ही कविता चांगलीच आवडली आहे..अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत..एका नेटक-याने म्हटलंय, 'आता नुपूर दीदी चांगली गायिका होण्यासोबतंच एक चांगली कवियीत्री देखील बनली आहे..' तर एकाने क्रितीसाठी लिहिलंय, 'आता तु केव्हा लिहिणार पुढची कविता ?' क्रितीने शेअर केलेल्या या व्हिडिओला आत्तार्यंत ७ लाख ६९ हजार ६४२ लोकांनी पाहिलं आहे..
नुकताच क्रितीने लॉकडाऊन दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोध्ये क्रितीचे आई-वडिल, बहिण नुपूर आणि तिचे दोन पाळीव कुत्रे दिसत आहे..क्रितीने हा फोटो क्लिक केला आहे..
या फोटोला कॅप्शन देताना क्रितीने लिहिलंय, 'माझे लॉकडाऊनमधील सोबती'..क्रितीच्या चाहत्यांना तिचा हा फॅमिली फोटो खुपंच आवडला आहे..दोन तासांतंच या फोटोला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत..
video created by nupur sanon went viral after share kriti sanon