सलमान खान लॉकडाऊनमध्ये खातोय घोड्यासोबत चारा

salman
salman

मुंबई- सलमान खान त्याच्या पाळीव प्राण्यांवर खुप प्रेम करतो..आणि अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवताना पाहायला मिळतो..लॉकडाऊनमुळे सलमान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे..मात्र फार्महाऊसवर सध्या तो त्याचा वेळ एन्जॉय करताना दिसून येतोय..नुकताच सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे...या व्हिडिओमध्ये तो त्याच्या घोड्यासोबत चारा खाताना दिसतोय..

सलमान खानने काही वेळापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्याच्या हातात हिरवा चारा दिसतोय..हा हिरवा चारा तो त्याच्या हाताने त्याच्या घोड्याला खायला देत आहे..मात्र या व्हिडिओमधील खास गोष्ट ही आहे की जो हिरवा चारा सलमान त्याच्या घोड्याला खायला दिसतोय तोच चारा तो स्वतःसुद्धा खाताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला..

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Breakfast with my love...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

हा व्हिडिओ शेअर करत सलमानने लिहिलंय, 'ब्रेकफास्ट विथ माय लव्ह'..म्हणजेच मी माझ्या प्रेमासोबत नाश्ता करतोय असं सलमानला म्हणायचं आहे..हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.इतकंच नाही तर सलमानच्या चाहत्यांच्या कमेंट्स देखील धुमाकुळ घालतायेत..

सांगायचं झालं तर सलमान जवळपास २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस लॉकडाऊनमुळे त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर अडकला आहे..देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे तो  तिथून निघू शकत नाहीये..काही दिवसांपूर्वी सलमानने एका व्हिडिओद्वारे तो फार्म हाऊसवर अडकल्याचं सांगितलं होतं..यासोबतंच सोहेल खानचा मुलगा निर्वाण याने देखील त्याच्या वडिलांना ३ आठवड्यांपासून पाहिलं नसल्याचं म्हटलंय..सलमानने सांगितलं की, तो कुटुंबासोबत काही दिवस वेळ घालवण्यासाठी तिथे गेला होता मात्र अचानक लॉकडाऊनची घोषणा झाल्याने तो तिथून निघू शकला नाही..

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यावेळी सलमान त्याच्या वडिलांना खूप मिस करत होता..वडिल सलीम खान ३ आठवड्यांपासून घरात एकटेच आहेत असं म्हणत त्याने वडिलांविषयी काळजी व्यक्त केली होती..सलमानसोबत सध्या बहीण अर्पिताचं कुटुंब आणि सोहेलची मुलं यांच्यासोबत फार्महाऊसवर वेळ घालवतोय...  

salman khan eating leafs with his horse in his farm house video goes viral  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com