जेव्हा दूरदर्शनसाठी शाहरुख करायचा सूत्रसंचालन ; पहा व्हिडीओ

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

सध्या किंगखानचा एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जाणून घ्या काय आहे कारण ! 

मुंबई : 'झिरो' चित्रपटानंतर शाहरुख दिसला नाही. सध्या तो सोशल मीडियावरही अॅक्टीव दिसत नाही. बॉलिवू़डचा किंग खान अर्थात शाहरुख आज सुपरस्टार असला तरी त्याने केलेलं स्ट्रगल सर्वांना माहितच आहे. करीअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुखने अनेक कार्यक्रमातून काम केले. सध्या किंगखानचा एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे शाहरुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जाणून घ्या काय आहे कारण ! 

शाहरुख सुरुवातीच्या काळात म्हणजेच 90 च्या दशकात दूरदर्शन वाहिनीसाठी सूत्रसंचालनाचं काम करत असे. त्यावेळेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दूरदर्शनवरील एक गाण्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. न्यू ईयरच्या सायंकाळच्या कार्यक्रमाचं होस्टींग शाहरुख एका महिला सूत्रसंचालिकेसोबत करताना दिसतोय. व्हिडीओमध्ये शाहरुख बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना आमंत्रित करतो. चाहत्यांनी या व्डिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत तो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#ShahrukhKhan as a tv anchor for a singing programs of #Doordarshan. #srk #shahrukh

A post shared by Bollywoodirect (@bollywoodirect) on

शाहरुखने 1992 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'दिवाना' चित्रपटासह त्याने बॉ़लिवूडमध्ये पाऊल टाकलं आणि त्यानंतर एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले. वेगळ्या अभिनय शैलीसह शाहरुखने चाहत्यांच्या मनात घर केले. 'राजू बन गया जेंटलमन', 'किंग अंकल', 'बाझीगर' आणि 'डर' असे काही जबरदस्त सिनेमे त्याने केले. त्यानंतर 'माय नेम इज खान', 'चक दे इंडिया', 'कुछ कुछ होता है', 'देवदास', 'कल हो ना हो', 'वीर झारा' हे शाहरुखने केलेले चित्रपट आजही चाहत्यांच्या मनावर कायम आहेत. 'डिअर जिंदगी'मध्ये तो आलिया भटसोबत दिसला. आपल्याहून निम्या वयाच्या अभिनेत्रीसह काम करुनही त्याने 'डॉक्टर जहांगिर खान' या भूमिकेला पूर्ण न्य़ाय दिला. प्रेक्षकांनी त्याने साकारलेल्या अनोख्या भूमिकेला भरपूर पसंती दिली.

नवीव टॅलेंटची बॉलिवूडमध्ये सतत एन्ट्री होत असते. तरी शाहरुखची जागा कोणी घेऊ शकणार नाही. आजही करोडो चाहत्यांच्या दिलाचा तो राजा आहे. 'धूम 4', 'डॉन 3' या चित्रपटांमधून तो झळकणार असल्याच्या चर्चा सध्या बी टाउनमध्ये आहेत. या सगळ्याचं स्पष्टीकरण देत शाहरुखने नुकतीच अशी माहिती दिली आहे की,' मी सध्या स्क्रिप्टवर काम करत आहे. मी आगामी कोणत्या चित्रपटामध्ये काम करणार याची घोषणा महिनाभरात करेन'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Want to know what Kaira and I talk about? Join us for a #DearZindagiSession in cinemas.

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video Of Shah Rukh Khan Anchoring Doordarshan Show