Vidya Balan : 'मला माझ्याच शरीराची लाज वाटायला लागली'! विद्या असं का म्हणाली?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
Vidya Balan comment on body shaming bollywood
Vidya Balan comment on body shaming bollywood esakal

Vidya Balan discloses she started hating her own body : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. सध्याच्या घडीला विद्या ही बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. डर्टी पिक्चर मधून विद्या बालन किती मोठ्या क्षमतेची अभिनेत्री आहे हे तिनं दाखवून दिलं आहे. आता विद्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

बॉलीवूडमध्ये बॉडी शेमिंग हा काही नवीन प्रकार नाही. गेल्या काही वर्षांपासून अनेक अभिनेत्रींनी त्यांना किती किळसवाण्या बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं आहे. त्यावर शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, रविना टंडन, काजोल, भूमी पेडणेकर, तब्बू यांच्यासारख्या अभिनेत्रींनी तीव्रपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासगळ्यात विद्या बालनची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात तिनं परखडपणे आपली बाजू मांडली आहे.

विद्याचा बॉलीवूडमधील संघर्ष मोठा आहे. एका जाहिरातीच्या माध्यमातून विद्या बॉलीवूडमध्ये आली. मात्र त्यावेळी तिची स्पर्धा अनेक दिग्गज अभिनेत्रींशी होती. त्यांना मात देत तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले. यासगळ्यात कित्येक वेगवेगळ्या चित्रपटांतून विद्याचा दर्जेदार अभिनय चाहत्यांना दिसून आला. इश्किया, शेरनी, शकुंतला देवी, कहानी, कहानी २ या सारख्या चित्रपटांमधून विद्यानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

विद्याला कित्येकदा तिच्या दिसण्यावरुन डिवचण्यात आले. बॉडी शेमिंगच्या हिणकस प्रकाराला तिला सामोरं जावं लागलं होतं. यासगळ्यात तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्यावेळी मला माझ्या दिसण्यावरुन अनेकजण बोलायचे, वेगवेगळ्या कमेंट पास करायचे. ही किती बेढब आहे दिसायला. अशा आशयाच्या त्या प्रतिक्रिया होत्या. मी मात्र यामुळे खचून न जाता त्यावर मात केली.

Vidya Balan comment on body shaming bollywood
Adipurush Controversy : 'कुराणावर एखादी डॉक्युमेंट्री करुन दाखवा'! कोर्ट असं का म्हणाले?

एक काळ असा होता की, मला माझ्याच शरीराची लाज वाटायला लागली होती. मी काहीशी बेढबही झाली होती. माझ्या आईनं देखील त्यावरुन मला बोलली होती. त्याचा एक वेगळाच कॉम्प्लेक्स आला होता. मी अनेकदा आजाराही पडायची.नंतर मला असे जाणवले की, आपण यासगळ्यावर मेहनतीनं मात करायला हवी. त्यानंतर आताचे चित्र वेगळे आहे. असे विद्यानं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com