Vidya Balan : विद्याच्या अंगावर फक्त पेपर! बाकीचे कपडे गेले कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Balan

Vidya Balan : विद्याच्या अंगावर फक्त पेपर! बाकीचे कपडे गेले कुठे?

बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयामुळे लोकांना वेड लावणारी अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. विद्या बालन अनेकवेळा मजेदार रील्स, फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. दरम्यान विद्याने कपड्यांशिवाय फोटोशूट केले आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. 

विद्या बालन फोटोमध्ये कपड्यांशिवाय दिसत आहे. तिने अंगावर फक्त वर्तमानपत्र घेतले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार डब्बू रतनानी याने हे फोटोशूट केले आहे. 

डॅब्बूने विद्या बालनचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये, विद्या कॉफी टेबलवर वृत्तपत्राने तिचे शरीर झाकून फोटोसाठी पोज दिली आहे. तिने एका हातात हातात एक कप घेतला आणि काळा चष्मा घातला आहे.  विद्याने तिचे कुरळे केस मोकडे सोडले आहेत. त्यामुळे ती हॉट दिसत आहे. 

Vidya Balan

Vidya Balan

विद्याच्या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहे. काही लोक स्तुती करत आहेत. तर काही नेटकरी तीला  खडेबोल सुनावत आहेत. विद्याचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :vidya balan