esakal | 'शेरनी' येतेय; अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार विद्या बालनचा चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Balan

'शेरनी' येतेय; अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार विद्या बालनचा चित्रपट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री विद्या बालनची Vidya Balan मुख्य भूमिका असलेला 'शेरनी' Sherni हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अमित मसूरकरने Amit Masurkar केलं असून अबंडनतिया एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे. चित्रपटात विद्या बालनसोबतच शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. (Vidya Balans Sherni to be directly premiere on amazon Prime Video on June)

याविषयी टी सीरिजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे.” याविषयीचा उत्साह शब्दांत मांडताना अबंडनतिया एंटरटेन्मेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला. इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. व्यंगात्मक टिपण्णी ही अमितची शैली सिनेमाच्या कथेला अधिक रंजक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे.”

हेही वाचा: लस घेण्याबाबत गर्भवती महिलांसाठी दिया मिर्झाची महत्त्वपूर्ण माहिती

स्मार्ट टीव्ही, मोबाईल, फायर स्टीक, टीव्ही स्टीक, फायर टॅबलेट, अॅपल टीव्ही इत्यादींवर प्राईम व्हिडीओ अॅपद्वारे कुठूनही, कधीही शेरनी हा चित्रपट प्राईमच्या ग्राहकांना पाहता येईल. भारतात प्राईम मेंबरना वर्षाला ९९९ किंवा मासिक १२९ रुपये भरावे लागतील.