esakal | विद्युतचा नादच खुळा! लग्नात पाहुण्यांसोबत स्कायडाइव्ह करण्याचा प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Vidyut Jammwal

विद्युतचा नादच खुळा! लग्नात १०० पाहुण्यांसोबत स्कायडाइव्ह करण्याचा प्लॅन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या स्टंट्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवालने Vidyut Jammwal काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड नंदिता महतानीशी Nandita Mahtani हटके अंदाजात साखरपुडा केला. आग्राजवळील मिलिटरी कॅम्पमध्ये १५० मीटर उंचीच्या भिंतीवरून रॅपलिंग करत विद्युतने तिला प्रपोज केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाविषयीचे प्लॅन्स सांगितले आहेत. इतरांप्रमाणेच लग्न केलं आणि फोटो काढले तर त्यात वेगळेपण काहीच राहणार नाही, असं म्हणत विद्युतने सर्वांत अनोखी कल्पना सांगितली. लग्नाच्या दिवशी १०० पाहुण्यांसोबत स्कायडाइव्ह करणार असल्याचं त्याने सांगितलं.

"लग्नाला आलेल्या १०० पाहुण्यांसोबत स्कायडाइव्ह करण्याचा प्लॅन आहे. हे थोडंसं भीतीदायक आणि आव्हानात्मक वाटत असलं तरी मला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे. विशेष म्हणजे त्या सर्व पाहुण्यांना माझ्यासोबतच स्कायडाइव्हिंगसाठी उडी मारावी लागेल," असं तो म्हणाला.

हेही वाचा: Zee Marathi Awards 2021: 'या' लोकप्रिय मालिकेला मिळाली सर्वाधिक नामांकनं

विद्युत जामवालने नंदितासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये विद्युत कमांडोच्या स्टाइलमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ताज महालासमोर दोघे उभे आहेत. विद्युतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘कमांडो स्टाइलमध्ये साखरपुडा केला. 1/09/2021.’

कोण आहे नंदिता महतानी?

विद्युत जामवालला क्लिन बोल्ड करणारी नंदिता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नंदिताने अनेक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्ससोबत काम केलं आहे. नंदिताचे नाव अभिनेता डिनो मोरियासोबतही जोडले गेले होते. मात्र व्यक्तीगत कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता.

loading image
go to top