'पिंकीचा विजय असो' मालिकेत युवराजच्या भूमिकेत दिसणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता | Pinki Cha Vijay Aso | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pinki Cha Vijay Aso

'पिंकीचा विजय असो' मालिकेत युवराजच्या भूमिकेत दिसणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता

स्टार प्रवाहवर लवकरच भेटीला येणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ (Pinki Cha Vijay Aso) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना देखील भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत युवराज ही व्यक्तिरेखा अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar) साकारणार आहे. विजयला याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षक भेटले आहेत. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत त्याने खलनायक साकारला होता.

पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज साकारण्यासाठी तो खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना विजय म्हणाला, ‘राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या गजराज धोंडे पाटील यांचा युवराज हा मुलगा. वडिलोपार्जित सत्ता-संपत्ती यामुळे रॉयल कारभार आणि ऐदीपणा असलेला. आपल्याला फक्त मान पाहिजे, जान गेली तरी चालेल हे युवराजचं ब्रीदवाक्य आहे. मान मिळवण्यासाठी युवराज काहीही करु शकतो. मालिकांमध्ये राजकारण हा विषय फार क्वचित हाताळला जातो. त्यामुळे पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे.'

Vijay Andalkar

Vijay Andalkar

या भूमिकेसाठी तयारी कशी केली, याबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, 'सातारी भाषा शिकण्यासाठी मी बरीच मेहनत घेतोय. माझ्या सातारच्या मित्रांना मी आवर्जून फोन करतो आणि सातारी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचं शूट साताऱ्यामध्ये सुरु असल्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांशीही बोलीभाषेत बोलतो. या भाषेत एक वेगळाच गोडवा आहे. साताऱ्यातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. डोंगर दऱ्यांमध्ये आम्ही शूट करतोय. इथे कायमस्वरुपी रहाणारी लोकं नशिबवान आहेत असं मला वाटतं. शुद्ध हवा, घरगुती जेवण यामुळे मी शूटिंगचा मनापासून आनंद लुटतोय.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top