Vijay Antony: "तिच्यासोबत मीही मेलो.." 16 वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर विजय अँटोनी दुःखात, पोस्ट वाचून पाणावतील डोळे

Vijay Antony Breaks Silence On Daughter Death:
Vijay Antony Breaks Silence On Daughter Death:SAKAL
Updated on

Vijay Antony Breaks Silence On Daughter Death: साउथ अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीची 16 वर्षीय मुलगी मीराने 19 सप्टेंबरला पहाटे आत्महत्या केली. मीराही राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. मीरा ही तणावात होती आणि तिच्यावर उपचार सुरु होते असे सांगण्यात येत आहे.

Vijay Antony Breaks Silence On Daughter Death:
Canadian Singer Shubh: "भारत माझाही देश तर पंजाब..",खलिस्तानी असल्याचा आरोप करत शो रद्द होताच कॅनडियन रॅपर शुभची प्रतिक्रिया चर्चेत!

मीरावर बुधवारी चेन्नई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या मृत्यूने विजयसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर विजयने आता त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लाडक्या लेकीसाठी अतिशय भावनिक नोट लिहिली आहे.

Vijay Antony Breaks Silence On Daughter Death:
Akshara Singh: बिहारमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात गायिकेने गायलं अश्लील गाणं! कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

विजय अँटोनीने एक्सवर एक भावनिक नोट शेयर केली. यात तो लिहितो की, 'माझी लाडकी लेक मीरा.. सर्वात दयाळू आणि धाडसी होती. पंथ, जात, धर्म, पैसा, मत्सर, वेदना, दारिद्र्य किंवा वाईट जग तिने सोडले आहे. ती आता शांततेने भरलेल्या ठिकाणी गेली आहे. असं मला वाटतं. ती अजूनही माझ्याशी बोलते आहे.

ती मेली तेव्हा तिच्यासोबत माझा देखील मृत्यू झाला आहे. आता मी तिच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली आहे. मी काही तिच्या नावाने काही चांगले काम सुरू करणार आहे. मला विश्वास आहे की हे सर्व त्याच्याकडूनच सुरू होईल.'

Vijay Antony Breaks Silence On Daughter Death:
Kangana On Alia Bhatt : 'तुला देशाच्या राष्ट्रपतींचे नाव माहिती नाही, तू म्हणजे....' कंगनानं शेलक्या शब्दांत आलियाचा घेतला समाचार

विजयची मुलगी मीरा ही चेन्नईतील एका खाजगी शाळेत शिकत होती. ती उत्तम बालकलाकार होती त्याचबरोबर शाळेच्या सांस्कृतिक विभागाची प्रमुख देखील होती. तिच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. असं काय कारण होत की मीराला आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com