Video Viral: विजय देवकोंडानं सगळ्यासमोर अनन्याला केलं किस, रणवीरला आला राग! |Vijay Deverakonda Ananya Pandey kiss video viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Deverakonda Ananya Pandey kiss video

Video Viral: विजय देवकोंडानं सगळ्यासमोर अनन्याला केलं किस, रणवीरला आला राग!

Liger Movie News: विजय देवरकोंडाच्या लायगरचा ट्रेलर काल सगळीकडे व्हायरल झाला. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आता लायगरची सर्वांना उत्सुकता आहे. त्यात अनन्या पांडे ही प्रमुख अभिनेत्री आहे. (vijay deverakonda) सध्या अनन्या आणि विजय देवरकोंडाच्या किसची चर्चा रंगली आहे. भर स्टेजवरच त्यानं अनन्याला किस केल्यानं बॉलीवूडचा प्रसिद्ध(bolywood actress ananya pandey) अभिनेता रणवीरला मात्र राग आला आहे. तो स्टेजवरुन निघुन गेल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर विजय आणि अनन्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

लायगरचा ट्रेलर हा हैद्राबादमध्ये तर मोठ्या थिएटरमध्ये प्रदर्शित (social media viral ranveer news) करण्यात आला होता. तर मुंबईमध्ये देखील दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रणवीर सिंग सहभागी (vijay ananya video viral) झाला होता. आता रणवीर म्हटल्यावर तो कार्यक्रम कसा होणार याचा अंदाज चाहत्यांना आला असेलच. मात्र त्या कार्यक्रमामध्ये विजय देवरकोंडानं जे काही केलं त्यामुळे रणवीरला आपली नाराजी लपवता आली नाही. तो त्या कार्यक्रमातून निघुन गेला.

त्याचं झालं असं की, रणवीर, विजय आणि अनन्या हे स्टेजवर डान्स करत होते. रणवीर विजयची एक डान्स स्टेप फॉलो करतो. त्यानंतर अनन्या येऊन त्यांच्यात सहभागी होते. तो डान्स सुरु असतानाच विजय अनन्याला किस करतो. त्यावेळी उपस्थित असणारे प्रेक्षकही अवाक होतात. त्यांना नेमकं काय चाललं हे कळेना, ते पाहून रणवीर विजयकडे पाहून थम्स अपही करतो. मात्र त्यानंतर तो तिथुन निघून जातो. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

हेही वाचा: Liger Trailer: लायगरच्या ट्रेलरसाठी एकच शब्द, 'कडक'

विजयच्या लायगर विषयी सांगायचे झाल्यास, विजयनं त्यात एका बॉक्सरची भूमिका केली आहे. अनन्या त्यात निशाची भूमिका केली असून ती विजयची प्रेमिका आहे. अनन्याबरोबरच राम्या कृष्णन, मकरंद देशपांडे, आणि विशेष म्हणजे माईक टायसन यांची या चित्रपटामध्ये दिसणार आहे. टायसन या चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे. लायगरचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतो आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: राखीशी प्रेमप्रकरण, आदिलला एक्स गर्लफ्रेंडकडून आत्महत्येची धमकी

Web Title: Vijay Deverakonda Ananya Pandey Kiss Video Viral Social Media Ranveer Singh Angry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top