विजय देवरकोंडा बुरखा घालून थिएटरमध्ये... अभिनेत्यानं सांगितला मजेदार किस्सा

विजय देवरकोंडा बुरखा घालून थिएटरामध्ये पोहोचला आणि...
Vijay Deverakonda
Vijay Deverakonda esakal

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा हा चित्रपट 'लाइगर' (Liger) प्रदर्शित झाल्याने खूपच आनंदी आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात विजय आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी 'लाइगर' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता एका मुलाखतीत विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda)चक्कीत करणार आणि खूपच मजेदार गोष्टीचा खुलासा केला आहे.

Vijay Deverakonda
Ranveer Singh : मुदतवाढ द्या, रणवीरची न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांकडे मागणी

चित्रपटगृहात बुरखा घालून जातो विजय

'लाईगर'च्या अगोदर विजय देवरकोंडाला अॅक्शनपटात दिसलेला नाही. त्याचा हा पहिला अॅक्शनपट आहे. त्यात तो बाॅक्सरची भूमिका करताना दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला अॅक्शन भूमिकेत पाहू इच्छित असल्याचा अंदाज आल्याचे त्याने नवीन मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला त्याचा तेलगू चित्रपट 'डिअर काॅम्रेड' च्या एका शोसाठी चित्रपटगृहात बुरखा घालून गेला होता. (Entertainment News)

या दरम्यान त्याने पाहिले की प्रेक्षक त्याचा वाद घालणारा सीन्स पाहून कसे प्रतिसाद देत होते. विजय देवरकोंडा म्हणतो, मी नेहमी अॅक्शनपट करु इच्छित होतो. मात्र मला वाटत नव्हते की मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. कधी-कधी मी काय करतो, तर मी बुरखा घालतो आणि चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांबरोबर बसतो. जर तुम्ही बुरखा घालून एखाद्या उंच माणसाला पाहू शकता तर तो मी असू शकतो. असचं मी डिअर काॅम्रेड पाहायला गेलो होतो.

Vijay Deverakonda
अमित शहांनी ज्यूनिअर एनटीआरची घेतली भेट, अभिनेत्याचे केले कौतुक

विजय पुढे म्हणतो, कोणत्याही वादाच्या सीन्सवर लोक आनंद व्यक्त करत होते. मात्र चित्रपटात मी भांडण केले नाही. मी एखादा संवाद बोलू लागायचो पुन्हा दुसरा कोणता तरी सीन येत. सर्व लोक फाईट पाहायला उत्सुक असत. मात्र मी ते त्यांना दाखवत नव्हतो. तेव्हा मला वाटले की ती लोक मला वेगळे रुपात पाहात आहेत आणि मी स्वतःला वेगळ्या नजरेने. मला त्यांना भावनेत अडकवायचे नाही. उलट त्यांना आनंदीत करणारे क्षण दाखवायचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com