मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

mutthaya murlidharan
mutthaya murlidharan

मुंबई- सिनेमा म्हटलं की मग यात अनेकांचे बायोपिकंही आलेच. मध्यंतरीच्या काळात तर बॉलीवूडमध्ये बायोपिकचं पिकंच आलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सिने जगतातील सेलिब्रिटींपासून ते क्रिडा विश्वापर्यंत अनेकांचे बायोपिक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या आवडत्या सेलिब्रिटींवर सिनेमे बनवताना जेवढी सिनेमाची टीम उत्सुक असते तितकेच आपल्या आवडत्या व्यक्तीच आयुष्य पाहण्यासाठी चाहते देखील तितकेच उत्सुक असतात. आता नुकतीच माहिती मिळतेय की श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर राहिलेला मुथैया मुरलीधरनवर सिनेमा बनणार आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये मुरलीधरनची मुख्य भूमिका तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती साकारणार आहे. मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकविषयी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. आता अभिनेता विजय सेतुपतीने स्वतः याला दुजोरा दिला आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. त्याने लिहिलंय, मी या जबरदस्त प्रोजेक्टचा भाग बनल्याने आनंदी आहे आणि स्वतःला भाग्यवान समजतोय. या बायोपिकविषयी लवकरंच अधिकृत अपडेट्स समोर येतील. 

सुरुवातीला चर्चा होती की दिग्गज स्पिनर मुथैया मुरलीधरनच्या या बायोपिक सिनेमाचं नाव ८०० असं असणार आहे. यामगचं कारण म्हणजे मुरलीधरनने टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट घेतल्या आहेत जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डच्या आसपास ऑस्ट्रेलिया दिग्गज शेन वॉर्न होता. ज्याने ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. 

विजय सेतुपतीने त्याच्या मुलाखतीत या बायोपिकविषयी बोलताना एकदा सांगितलं होतं, 'मी मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकसोबत जोडलो गेल्याने आनंदी आहे. ते तमिळमधील आयकॉनिक स्पोर्ट्समन आहेत आणि त्यांनी संपूर्ण जगावर त्यांची छाप सोडली आहे. त्यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हान असेल मी त्याची वाट पाहतोय.'  या सिनेमाचं दिग्दर्शन एम.एस. श्रीपथी करतील. या भूमिकेसाठी विजय मुरलीधरनकडून ट्रेनिंग घेत आहे. तो त्याची बॉलिंग स्टाईल शिकवतोय.   

vijay sethupathi to play muthiah muralidaran in biopic new updates soon  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com