esakal | मुरलीधरनने असे काय सांगितले की, ज्यामुळे विजय सेतूपतीने घेतली माघार
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Sethupathi walks out of the film 800 after Muttiah Muralitharans request

महेंद्रसिंग धोनी नंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि अशा अनेक बड्या खेळाडूंवर बायोपिक बनविण्यात आले आहे. आणि आता यात आणखी एका बायोपिकचे नाव जोडले गेले होते. श्रीलंका आणि क्रिकेट विश्वाचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर चित्रपट बनणार होता.

मुरलीधरनने असे काय सांगितले की, ज्यामुळे विजय सेतूपतीने घेतली माघार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - श्रीलंकेचा जगविख्यात फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सुपरस्टार विजय सेतूपती काम करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या दोघांच्या चाहत्य़ांमध्ये कमालीची उत्सुकता होती. याबद्दल विजयने आपल्या सोशल अकाऊंटवरुनही माहिती प्रसिध्द केली होती. मात्र आता मुरलीधरनने अशी काही गुगली टाकली की, त्यामुळे विजयला या चित्रपटातून माघार घेण्याचा विचार केला आहे. मुरलीधरनच्या आयुष्यावर ‘800’ नावाने चित्रपट येणार होता.

महेंद्रसिंग धोनी नंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि अशा अनेक बड्या खेळाडूंवर बायोपिक बनविण्यात आले आहे. आणि आता यात आणखी एका बायोपिकचे नाव जोडले गेले होते. श्रीलंका आणि क्रिकेट विश्वाचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर चित्रपट बनणार होता. मुथय्या मुरलीधरनचे पात्र मोठ्या पडद्यावर तमिळ स्टार विजय सेतूपती साकारणार असल्याची चर्चा होती. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील ट्विटरवरून मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बायोपिक करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी या चित्रपटात तमिळ अभिनेता विजय सेतूपती मुरलीधरनच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले होते. यावर मुरलीधरनच्या सोशल मीडिय़ावरील एका मेसेजमुळे विजयने हा सिनेमा नाकारला आहे.

मुरलीधरन हा एक श्रीलंकन तामिळीयन आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याने श्रीलंकन लष्कराने 2009 मध्ये ज्या तामिळ लोकांना मारले होते त्या घटनेचे समर्थन केले होते. त्यात त्याच्या चित्रपटामध्ये विजय सेतूपती काम करणार असल्याचे समजताच भारतातील तामिळ लोकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. यावर मुरलीधरन याने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, विजयने माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करु नये. त्याने हा चित्रपट सोडावा अशी मी त्याला विनंती करतो. माझ्यामुळे त्याला भविष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ नये असे मला वाटते. हा चित्रपट केल्याने त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अशी भीती मुरलीधरनला वाटते. यावर विजयने थॅक्स आणि गुडबाय असे टिव्ट केले आहे.

माझ्या '800' या चित्रपटावरुन वाद होण्याची शक्यता आहे. तेव्हा माझ्यामुळे विजय सारख्या गुणवंत अभिनेत्याची कारकीर्द पणाला लागू नये असे मला वाटते. तामिळनाडूतील या अभिनेत्याला माझ्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. असेही मुरलीधरने म्हटले आहे. यापूर्वी क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेक जणांच्या जीवनावर चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर आलेला चित्रपट 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चांगलाच गाजला.