Vijay Varma and Tamannaah Bhatia
Vijay Varma and Tamannaah Bhatia Sakal

Vijay Varma Tamannaah Bhatia : 'खरं सांगा मालदीवला एन्जॉय केला की नाही?' विजयला 'तो' प्रश्न विचारताच आला राग

विजयनं पत्रकाराचा तो प्रश्न ऐकला आणि त्याला राग अनावर झाला.

Vijay Varma Tamannaah Bhatia Maldivies Trips social media : बॉलीवूडमध्ये सध्या विजय वर्मा आणि तमन्ना भाटीया यांच्यातील प्रेमप्रकरण काही लपून राहिलेलं नाही. त्यांच्यातील लवस्टोरीची चर्चा नेहमीच चाहत्यांच्या आवडीचा भाग राहिला आहे. सध्या हे दोन्ही सेलिब्रेटी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी तमन्नाचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात तमन्नाचा काबालिया नावाच्या गाण्यानं आणि तिच्या नृत्यानं कमाल केली होती. तिचं कौतुक केलं होतं. सोशल मीडियावर तमन्नाची नेटकऱ्यांनी स्तुतीही केली आहे. अशात एका गोष्टीमुळे तमन्ना आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा हे दोघेही सेलिब्रेटी लाईमलाईटमध्ये आले आहेत.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

विजयनं पत्रकाराचा तो प्रश्न ऐकला आणि त्याला राग अनावर झाला. तो त्या पत्रकाराला म्हणाला, तुम्ही असे प्रश्न विचारु शकत नाही. आम्हाला आमची स्पेस आणि प्रायव्हसी आहे की नाही, असे प्रश्न विचारुन तुम्हाला काय साध्य करायचे असते. तुम्ही प्लीज असे प्रश्न विचारु नका. त्यामुळे खूप वाईट वाटते. अशा शब्दांत विजयनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ती चर्चेत आली आहे.

त्याचं झालं असं की, विजय आणि तमन्ना मालदीवच्या सुट्टीवरुन भारतात आले खरे, दोघेही एकमेकांसोबत बोलत, हसत विमानतळावर स्पॉट झाले. त्याचवेळी त्यांना नको तो प्रश्न विचारुन पत्रकारांनी हैराण केले. विजयनं काही बोलण्यापूर्वी तमन्नानं मीडियाशी बातचीत केली होती. मात्र जेव्हा विजयला मालदीवमधील इंजॉयमेंट कशी होती असे प्रश्न विचारण्यात आले

यापूर्वी तमन्ना आणि विजय हे लस्ट स्टोरीज २ या मालिकेतून एकत्र आले होते. त्यातील त्यांच्या बोल्ड सीन्सची खूपच चर्चाही झाली होती. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्यातील नात्यावर अनेकांनी विविध प्रश्नही उपस्थित केले होते. अखेर दोन्ही सेलिब्रेटींनी त्यावर अप्रत्यक्षपणे भाष्यही केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या अनेक फोटो आणि व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते.

काही दिवसांपूर्वी विजय आणि तमन्ना हे मालदीवच्या व्हेकेशनसाठी गेले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या व्हॅकेशनवरुन पुन्हा मुंबईत आल्यानंतर मात्र जे घडले त्यावरुन विजयचा संताप झाला आहे. त्यानं त्या पापाराझ्झीला चांगलेच सुनावले आहे, तो प्रश्न ऐकताच त्याला राग अनावर झाल्याचे दिसून आले. दोघांच्या प्रोजेक्टसविषयी सांगायचे झाल्यास आगामी काळात मोठ्या बॅनरचे चित्रपट असणार आहेत.

Vijay Varma and Tamannaah Bhatia
Baaplyok Review: बापाच्या कठोर चेहऱ्यामागचा हळवा माणुस पाहायला शिकवणारा बापल्योक, कसा आहे सिनेमा? वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com