Vikram Gokhale: विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा, पोस्टर अनावरण करताना महेश मांजरेकर भावुक

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर अनावरण झालं
vikram gokhale last movie sur lagu de poster launch mahesh manjrekar emotional
vikram gokhale last movie sur lagu de poster launch mahesh manjrekar emotionalSAKAL

Vikram Gokhale Last Movie: विक्रम गोखले हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. विक्रम गोखले यांचं काही महिन्यांपुर्वी निधन झालं. विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात एक न भरता येणारी पोकळी निर्माण झालीय.

विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला शेवटचा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा सिनेमा म्हणजे सूर लागू दे. या सिनेमाचं काल पोस्टर अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी अभिनेते - दिग्दर्शक महेश मांजरेकर भावुक झालेले दिसले.

(vikram gokhale last movie sur lagu de poster launch mahesh manjrekar emotional)

vikram gokhale last movie sur lagu de poster launch mahesh manjrekar emotional
Urfi Javed: राजपाल यादवचा 'भुलभुलैया' लुक केल्यामुळे उर्फीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

महेश मांजरेकर यांना आली विक्रम गोखलेंची आठवण

महेश मांजरेकर विक्रम गोखलेंचा शेवटचा सिनेमा असलेल्या सूर लागू दे सिनेमाच्या पोस्टर अनावरणावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विक्रम गोखले यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

"मी त्यांच्यासोबत चांगले क्षण घालवले. मी त्यांच्यासोबत नटसम्राट सिनेमात काम केलं. ते काही क्षण सिनेमानिमित्त होते पण बाकी आम्ही मी शिवाजी पार्क आणि इतर काही सिनेमात एकत्र वेळ घालवला. ते दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणुन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. हा त्यांचा शेवटचा सिनेमा खुप ब्लॉकबस्टर होवो ही माझी अपेक्षा आहे."

विक्रम गोखलेंच्या पश्चात त्यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर लॉंच

विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. गोखलेंची अखेरची कलाकृती ठरलेल्या 'सूर लागू दे' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केलं आहे.

या तारखेला होणार सिनेमा रिलीज

आता 'सूर लागू दे' हा सिनेमा रसिकांच्या मनाचे सूर छेडण्यासाठी सज्ज झाला असून पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येणार आहे.

३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो. याच दिवसाचं औचित्य साधत बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते 'सूर लागू दे'च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांनी व्यक्त केली.

'सूर लागू दे'च्या रूपात प्रेक्षकांना एक परिपूर्ण कलाकृती पाहायला मिळेल असेही ते म्हणाले. १२ जानेवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com