माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही;  विक्रम गोखले
माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले

माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले

sakal_logo
By
प्रणाली मोरे

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतनं(kangana ranaut) भारताला स्वातंत्र्य 15ऑगस्ट 1947ला मिळालं नसून ते 2014 मध्ये मिळालं,तर 1947 चं स्वातंत्र्य ही भीक होती, असं बाष्कळ विधान केलं आणि समाजातील सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेचा सूर उमटला. पण कंगनाच्या या विधानाला काहींनी सहमती दर्शवली आणि नकळत या प्रकरणात उडी घेतली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनीही(Vikram Gokhle) आपली सहमती दर्शवून सर्वांचा रोष ओढवून घेतला.

आज विक्रम गोखलेंनी सर्वांच्या या रोषाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेत गोखले बॉलीवूडपासून राजकीय पक्ष,राजकीय नेते आणि धर्मनिरपेक्ष अशा सर्व विषयांवर बोलले. सुरवातीला भाषणाची सुरुवात करताना गोखले म्हणाले, "आपण स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला नाही,हे मी स्पष्ट करतो. आपल्याला राजकीय प्रवेशासंदर्भात निमंत्रण आलेलं आहे. पण आपण कोणाकडेही जाणार नाही. माझे त्यांच्यापैकी अनेकांशी चांगले संबंध आहेत. पण ते किती स्वार्थी आहेत हे मला माहिती आहे. धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्र्वास नाही. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यावं हे विधान करून गोखलेंनी मोठं भाष्य केल्याचं बोललं जातंय. अजूनही वेळ गेलेली नाही. आपला देश विचित्र कड्यावर उभा आहे. मतपेटयांच्या राजकारणात पडू नका. अशी वक्तव्य करून त्यांनी एकाअर्थाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसंदर्भात आपल्या विरोधाचा सुर ओढल्याचं म्हटलं जातंय. हा देश भगवाच राहणार,हिरवा होणार नाही असं वक्तव्य आपण जे आपल्या भाषणात केलं होतं त्याचंच हे उत्तर आहे असं त्यांनी नमूद केलं."

विक्रम गोखले या पत्रकार परिषदेत आर्यन खान प्रकरणावर म्हणाले,"आर्यन खान आणि शाहरुख खान प्रकरण जे चालू आहे ते क्षुल्लक आहे. शाहरुखच काय तर बॉलीवूडमधला कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. मी माझ्या बापाचं नाव लावतो. तो विषय अंत्यत फालतू विषय होता. या बातम्यांव्यतिरिक्त पत्रकारांनी काही चांगल्या बातम्या करायला हव्यात. तेव्हा त्यांनी बॉर्डरवर 21 वर्षांच्या मुलाने देशासाठी दहशतवादांच्या गोळ्या झेलल्या ही बातमी करायला हवी. माझ्यासाठी तो नायक आहे.. शाहरुख किंवा आर्यनला स्टार बनवू नका."

मी कंगनाच्या वक्तव्यावर जे बोललोय त्याचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले. मला जे वाटतं ते मी बोलणार,कुणी माझं काही वाकडं करणार नाही. माझ्याविरोधात काड्या लावून काही होणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेत बॉलीवूडपासून राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांवर स्फोटक भाष्य करून विक्रम गोखले यांनी हा विषय अधिक व्यापक केलाय.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

loading image
go to top