Vikrant Massey Baby: 'विक्रांत-शीतल' झाले आई बाबा! १२ वी फेल फेम अभिनेत्यानं दिली 'गुड न्यूज'

विक्रांत आणि त्याची पत्नी शितल ठाकूर (Vikrant Massey and Sheetal Thakur) यांनी इंस्टावर पोस्ट शेयर करत गोड बातमी दिली आहे.
Vikrant Massey Become Father
Vikrant Massey Become Fatheresakal

Vikrant Massey Become Father : १२ वी फेल या चित्रपटातून चर्चेत आलेल्या अभिनेता विक्रांत मेस्सीची सध्या मोठी क्रेझ आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या याच चित्रपटासाठी त्याला यंदाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला. बॉक्स ऑफिसवर १२ वी फेलनं (12th fail movie) मोठी कमाई केली असून बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी विक्रांतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आता आणखी एका कारणामुळे विक्रांत हा चर्चेत आला आहे. त्यानं आणि त्याची पत्नी शितल ठाकूर (Vikrant Massey and Sheetal Thakur) यांनी इंस्टावर पोस्ट शेयर करत गोड बातमी दिली आहे. हे दोघे सेलिब्रेटी आई बाबा झाले असून त्यांच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

एकीकडे विक्रांत त्याच्या १२ वी फेल या चित्रपटाला मिळालेले यश आणि (Vikrant Massey and Sheetal Thakur Latest News) त्याच्या कौतुकाचा स्विकार करत असतानाच त्याला मिळालेली गुड न्यूज यामुळे चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. काल विक्रांतनं सोशल मीडियावर पोस्ट करत आपण बाबा झाल्याची पोस्ट शेयर केली. त्याला मुलगा झाला असून त्यानं आपला हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबतही साजरा केला आहे.

त्या पोस्टमध्ये त्यानं एक नोटही लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, आम्हाला आमच्या मुलाचे आगमन झाले याची घोषणा करताना खूप सारा आनंद होतो आहे. आम्ही खूपच आनंदित आहोत. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारं प्रेम... त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचा आनंद द्विगुणीत केला आहे.

Vikrant Massey Become Father
12th Fail movie Anand Mahindra: "राष्ट्रीय पुरस्कार मिळणारच!" '12th फेल' वर आनंद महिद्रांनी केला कौतुकाचा वर्षाव

यावेळी विक्रांतनं २४ सप्टेंबर २०२३ मधील एक फोटो शेयर केला असून त्यात त्यानं शितलच्या प्रेग्नंसीविषयी चाहत्यांना सांगितले होते. शितल आणि त्याच्या लवस्टोरीबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. विक्रांतच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तो विधू विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेलमध्ये दिसला होता. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यानंतर तो फिर आयी हसीन दिलरुबा आणि सेक्टर ३६ मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com