Vikrant Massey News : अखेर '12 वी फेल'च्या विक्रांत मेस्सीनं 'सारा अली खान'ची सगळ्यांसमोर मागितली माफी! काय होतं प्रकरण?

विक्रांत मेस्सी (Vikrant Massey News) हा सारा अली खानची माफी मागितल्या प्रकरणी चर्चेत आला आहे.
Vikrant Massey News
Vikrant Massey Newsesakal

Vikrant Massey News : विधू विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल या चित्रपटानं (12th Fail Movie News) साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. विक्रांत मेस्सीनं त्यात मनोज शर्मा नावाच्या सनदी अधिकाऱ्याची भूमिका (Vikrant Massey Latest News) साकारली होती. या चित्रपटानं विक्रांतला फिल्मफेयरही मिळवून दिलं. या सगळ्यात विक्रांतच्या नावाचा समावेश आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये झाला. यानंतर विक्रांत सतत लाईमलाईटमध्ये राहिला आहे.

आता विक्रांत हा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्यानं प्रसिद्ध (sara ali khan news) अभिनेत्री सारा अली खानची माफी मागितली आहे. सारा ही आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे व्हायरल होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून (sara ali khan ae watan mere watan movie) सारानं तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. ती येत्या काळात ये वतन मेरे वतन नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान विक्रांतनं त्याला साराची माफी का मागावी लागली हे सांगून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१५ मार्च रोजी सारा अली खानची मर्डर मुबारक नावाची फिल्म रिलीज (Murder Mubarak Movie) झाली. त्यातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. २१ मार्च रोजी ये वतन मेरे वतन नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे.

विक्रांतला का मागावी लागली माफी?

विक्रांत अन् सारानं गॅसलाईट नावाच्या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. साराला बॉलीवूडमध्ये काम मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. तिला त्या सेलिब्रेटी किड असल्याचे प्रीव्हिलेज मिळाले. सारा अन् अभिनयाचा फारसा संबंध नाही. अशा आशयाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. विक्रांतनं साराबद्दल जे काही ऐकलं त्याविषयी त्यानं तिच्याविषयी एक वेगळ्या प्रकारचे मत तयार करुन टाकले होते.

विक्रांत म्हणतो, या गोष्टी एवढ्या वाढल्या होत्या की, साराबाबत माझ्या मनातली प्रतिमा वेगळी तयार झाली. मला असं वाटायचं की, साराचा ओरा काही वेगळाच असेल. तिचा खास मेक अप आर्टिस्ट असेल, कारण ती स्टार किड होती. मात्र मी ज्यावेळी साराची मेहनत आणि तिची कामाप्रती असणारी निष्ठा पाहिली तेव्हा मात्र मी प्रभावित झालो. त्यानंतर मी तिची माफी मागितली.

सारानं या सगळ्या प्रकरणावर असे म्हटले होते की, मला आता आठवत नाही विक्रांतनं कधी माफी मागितली ते. पण एक मात्र नक्की मी स्टारकिड असल्यानं मला अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्याची सवय आहे. मी अनेकांकडून त्याबाबत खूपदा ऐकत आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com