esakal | पंतप्रधान मोदींच्या निर्णयांवर 'वेबसीरिज';विपुल शहांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Vipul Shah

पंतप्रधान मोदींच्या निर्णयांवर 'वेबसीरिज';विपुल शहांचा पुढाकार

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता विपुल शहा (bollywood special producer and director) सध्या सोशल मीडियावर चर्चेत (social media) आले आहे. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हॅक्सिनेशन (vaccination) संबंधी केलेलं कौतूक. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना प्रशासनाची दमछाक होताना दिसते आहे. काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या काही अंशी कमी झाली असली तरी अद्याप व्हॅक्सिनेशनचा प्रश्न सुटलेला नाही. त्यावर तातडीनं उपाययोजना करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. (vipul amrutlal shah praises pm narendra modi free covid 19 vaccine initiative)

गेल्या आठवड्यात मोदींनी यापुढील काळात व्हॅक्सिनेशनची (vaccination) जबाबदारी केंद्राची असणार असे सांगितले होते. यामुळे पुढील काही दिवसांत नागरिकांना व्हॅक्सिनेशनसाठी जास्त काळ वाट पाहावे लागणार नसल्याची चर्चा आहे. यासगळ्या परिस्थितीत बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात लोकांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांनी व्हॅक्सिनेशनसाठी पुढाकारही घेतला आहे. सध्या बॉलीवूडचे प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक विपुल शहा (vipul shah) यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केल्याचे दिसून आले आहे. त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

विपुल शहा यांनी सांगितले आहे की, प्रधानमंत्री मोदींनी व्हॅक्सिनेशनची जी घोषणा केली आहे त्याचे कौतूक वाटते. तो एक चांगला निर्णय आहे. लोकांना आता ख-या अर्थानं मदतीची गरज आहे. आणि मोदींनी लोकांची मदत केली आहे. लोकांना मोफत व्हॅक्सिनेशन करण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. त्याचे कौतूक शहा यांनी केले आहे. याचा फायदा समाजातील गरीब लोकांना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

हेही वाचा: The Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी

हेही वाचा: शेखर संजनाला मुंबईला घेऊन जाणार?;पाहा व्हिडिओ

सध्या शहा आपल्या ह्युमन नावाच्या वेब सीरिजमध्ये व्यस्त आहेत. ती मालिका म्हणजे एक इमोशनल ड्रामा आहे. एका मेडिकल टेस्टवर आधारित ती मालिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक निर्णयावर बेतलेली आहे. मोदींनी जे निर्णय घेतले आहे ते स्वागतार्ह आहेत. दिवाळीपर्यत गरिबांना मोफत धान्य देणं हा देखील कौतूकास्पद निर्णय म्हणावा लागेल.