'प्रत्येक देशाची चांगली-वाईट बाजू असते'; वादानंतर वीर दासचं स्पष्टीकरण | Vir Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das

'प्रत्येक देशाची चांगली-वाईट बाजू असते'; वादानंतर वीर दासचं स्पष्टीकरण

आपल्या‘ स्टॅन्ड अप’ कॉमेडी शोमध्ये भारताबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिपणी केल्याच्या आरोपावरून वीर दास Vir Das याच्या विरोधात दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि शशी थरूर यांनी या प्रकरणी वीर दासचे समर्थन केले. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावत हिने टीका केली. आता याप्रकरणी वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. मंगळवारी त्याने ट्विटरवर पोस्ट लिहित कवितेबद्दल स्पष्टीकरण दिलं. "मी कवितेतून जे काही म्हटले ते काही गुपित नाही", असे तो म्हणाला. Two Indians Controversy

वीर दासचे स्पष्टीकरण-

"या व्हिडीओतून दोन विभिन्न भारतात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या दोन बाजू उपहासात्मक पद्धतीने मांडण्याचा माझा प्रयत्न होता. प्रत्येक देशाची चांगली आणि वाईट बाजू असते. मी सांगितलेल्या गोष्टी आता कोणासाठी काही गुपित नाही. आपण महान आहोत हे कधीही विसरू नका आणि आपल्याला ज्या गोष्टी महान बनवतात त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन करणारा हा व्हिडीओ आहे", असा खुलासा करणारे ‘ट्विट’ त्याने केले.

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

वीर दास याने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील जॉन एफ केनेडी सेंटर ऑफ परफॉर्मिंग येथे सादर केलेल्या ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला होता. या व्हिडिओत तो म्हणतो, ‘‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते, तर रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान आहे, पण आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर धावून जातो.’’ यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या टिपणीसाठी वीर दासवर टीका केली. कंगनाने त्याच्या या म्हणण्याला सॉफ्ट दहशतवाद म्हटले आहे. ती लिहिते की, हे एक अशा बिघडलेल्या भारतीय माणसाचे उदाहरण आहे, जो कोणत्याही गोष्टीत चांगला नाही. त्यामुळे तो आपल्यासारख्या लोकांमध्येच असे घाणेरडेपणा विकतो. तसेच तिने वीर दासविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top