esakal | रानू मंडलवर बायोपिक; 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

ranu mandal

रानू मंडलवर बायोपिक; 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोणाचं नशीब कधी बदलेल हे काही सांगता येणार नाही. रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडलसोबतही Ranu Mandal असंच काहीसं झालं आहे. कोलकातामधील रेल्वे स्टेशनवर गाण्याऱ्या रानू मंडलचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगरपर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने रानू यांना त्याच्या सिनेमातील गाण्यासाठी ऑफर दिली. आता रानू मंडल यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. मिस रानू मारिया असं या चित्रपटाचं नाव असेल.

ऋषिकेश मंडल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून मुंबई आणि कोलकातामध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे. रानू जिथे राहिल्या, तिथेच शूटिंग केलं जाईल, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली. रानू मंडल यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री इशिका डे मुख्य भूमिका साकारणार आहे. इशिकाने याआधी काही हिंदी आणि बांग्ला चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रानू यांच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्तीला विचारण्यात आलं होतं. मात्र तारखा जुळत नसल्याने अखेर ही भूमिका इशिकाच्या पदरात पडली.

हेही वाचा: Money Heist 5: टोकियोच्या मृत्यूनंतर चाहते भावूक; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

इशिकाने रानू मंडल यांच्या भूमिकेसाठी तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रातोरात स्टार झालेल्या रानू यांना आतापर्यंत अनेक ऑफर आल्या आहेत. केवळ एका व्हिडीओने त्यांचं आयुष्य बदललं. एवढंच नाही तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून दूर गेलेली त्यांची मुलगीदेखील परतली.

loading image
go to top