esakal | अनुष्काने दिलं होतं '३ इडियट्स'साठी ऑडिशन; पाहा व्हायरल व्हिडीओ

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma
अनुष्काने दिलं होतं '३ इडियट्स'साठी ऑडिशन; पाहा व्हायरल व्हिडीओ
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आता अनुष्काचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आमिर खानच्या '३ इडियट्स' या चित्रपटासाठी ऑडिशन देताना दिसतेय. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात अभिनेत्री ग्रेसी सिंगच्या तोंडी असलेला एक डायलॉग ती ऑडिशनदरम्यान बोलतेय. या व्हिडीओवर अनुष्काच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

या ऑडिशनमध्ये अनुष्काची निवड झाली नव्हती. मात्र त्याच्या पाच वर्षांनंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'पीके' या चित्रपटासाठी तिची निवड केली. या चित्रपटात तिने आमिर खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. 'पीके' या चित्रपटात अनुष्का एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसली होती.

हेही वाचा : तुम्हाला माहितीये का, ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध

अनुष्काने २०१७ मध्ये क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नगाठ बांधली. या दोघांना वामिका नावाची एक मुलगी आहे. अनुष्काच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती २०१८ मध्ये 'झिरो' या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत काम केलं होतं. अनुष्काची स्वत:ची निर्मिती संस्था असून त्याअंतर्गत 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अनुष्का शर्मा निर्मित 'पाताल लोक' ही वेब सीरिजसुद्धा चांगलीच चर्चेत होती.