
विराटने म्हटलं की, तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आज आमच्या घरी कन्या आली. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांसाठी आभार मानतो.
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मुलगी झाली. विराटने स्वत: सोशल मीडियावरून याची माहिती दिली. बाळाच्या जन्माआधी विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आला होता. त्याने यासाठी सुट्टी घेतली होती.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
विराटने म्हटलं की, तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आज आमच्या घरी कन्या आली. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांसाठी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोघीही छान आहेत. आमच्या आय़ुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात झाली असून आमच्या खासगीपणाचा तुम्ही आदर राखाल अशी अपेक्षा. तुमचाच विराट.
विराट आणि अनुष्का यांचे लग्न 11 डिसेंबर 2017 मध्ये झाले होते. इटलीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.