विराटने घातला अनुष्काच्या नावाचा टि-शर्ट; फोटो झाला व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

विराटचं त्याची पत्नी अनुष्कावर किती प्रेम आहे हे त्याच्या नव्य़ा इन्स्टाग्राम पोस्टवरुन लक्षात येत आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल अनेकदा इंटरनेट सेंसेशन झाल्याचं समोर येतं. सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या जोडप्यांपैकी ते आहेत. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेटकऱ्यांना अनेकदा आला आहे. विराटचं त्याची पत्नी अनुष्कावर किती प्रेम आहे हे त्याच्या नव्य़ा इन्स्टाग्राम पोस्टवरुन लक्षात येत आहे. 

या फोटोमध्ये विराट एका नदीकिनारी निवांत बसलेला दिसत आहे. विशेष म्हणजे विराटने चक्क अनुष्का नावाच्या पहिल्य़ा अक्षराचं टि-शर्ट घातलं आहे. 'A' या अक्षरासोबत एक हृदयदेखील दिसत आहे. विराटने या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, ''तो क्षण कैद झाला आहे. फोटो क्रेडिट - अनुष्का शर्मा".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Caught in the moment. Pic credit @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

या फोटोला नेटकऱ्यांनी कमेंटसह भरभरून प्रेम दिलय. हे जोडपं म्हणजे 'कपल गोल' असल्याचं चाहत्यांचं मत आहे. विराटचा हा फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी त्यांच्या वेकेशनचे फोटो अपलोड केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Flaunting The Initials Of Wife Anushka Sharma s Name On His Tshirt Is Beyond Romantic