
Anushka Sharma : अनुष्काच माझी प्रेरणा, आई म्हणून तिनं... विराटच्या डोळ्यात पाणी!
Virat Kohli On Anushka : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव विराट कोहली हे दोन्ही मोठे सेलिब्रेटी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. या दोन्ही सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी पापाराझ्झी नेहमीच प्रतिक्षेत असतात.
कुणीही आपल्या परवानगीशिवाय फोटो काढायचा नाही.अशी सक्त ताकीद या दोन्ही सेलिब्रेटींनी फोटोग्राफर्सला सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या लेकीचा वामिकाचा फोटो पापाराझींनी प्रसिद्ध केला होता. त्यावरुन अनुष्काचा संताप झाला होता. तिनं सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. विराटनं देखील तुम्ही आमच्या वैयक्तिक आय़ुष्यावर गदा आणण्याचा प्रयत्न का करता असा प्रश्न विचारला होता.
Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
अनुष्कानं तर दरवेळी सेलिब्रेटींची प्रायव्हसी भंग करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. त्यावरुन कुणी काहीही बोलत नाही. अशी खंत व्यक्त केली होती. यासगळ्यात आता विराटचा एक इंटरव्ह्यु व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामध्ये त्यानं पत्नी अनुष्काविषयी जी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. विराटनं आपल्या साऱ्या यशाचे श्रेय अनुष्काला दिले आहे.
विराटनं त्या मुलाखतीमध्ये अनुष्काविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, आजवर जे यश मिळाले आहे त्यामध्ये अनुष्काचा वाटा सर्वात महत्वाचा आहे. तिनं माझ्यासाठी खूप काही त्याग केला आहे. तिच्या त्यागातून मला नेहमीच प्रेरणा मिळत गेली हे मला आवर्जुन सांगावे लागेल. अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे.