विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...

अभिनेत्री आणि हास्यरथी विशाखा सुभेदार हिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडल्याची घोषणा केली आहे. मालिका का सोडली हे सांगणारी एक भावनिक पोस्ट तिने लिहीली आहे.
vishakha subhedar and sameer chaugule
vishakha subhedar and sameer chaugulefacebook

महाराष्ट्राला विनोदाचा मोठा वारसा आहे. नाटक. चित्रपट यापाठोपाठ मालिका विश्वानेही हा वारसा जपला. म्हणूनच प्रत्येक मराठी वाहिनीवर कौटुंबिक मालिकांसोबतच विनोदी कार्यक्रम ही आवर्जून दाखवले जातात. हसा चकट फू, टिकल ते पोलिटिकल पासून हास्यसम्राट, फु बाई फु , कॉमेडी एक्स्प्रेस, बुटेल ट्रेन, चला हवा येऊ द्या ते घराघरात धुमाकूळ घालणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा; अशी बरीच लांबलचक यादी आहे.

vishakha subhedar and sameer chaugule
Vivek agnihotri : कोट्यावधींच्या कमाईनंतर विवेक अग्निहोत्रींची ही प्रतिक्रिया..

गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार' यांची जोडी, ही जोडी मंचावर आली की हसून डोळे पाणवणार हे निश्चित असते. अनेक पात्र, नाना तर्हेचे विनोद करून यांनी आपल्याला लोटपोट केले. पण आता मात्र ही जोडी आपल्याला कार्यक्रमात दिसणार नाही.

vishakha subhedar and sameer chaugule
The kashmir files : परेश रावल यांनी केजरीवालांना सुनावले, जो मुलांची खोटी शपथ घेऊ शकतो..

हास्य रसिकांसाठी तशी ही मोठी धक्कादायक बाब आहे. पण हे खरे आहे की, आता विशाखा सुभेदार (vishakha subhedar) हिने हास्यजत्रेत काम न करण्याचा मोठा निर्णय घेलता आहे. नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने मोठे सेलिब्रेशनही करण्यात आले होते. ५०० नव्हे तर ५००० भाग पूर्ण होवोत अशा शुभेच्छा या मालिकेला प्रेक्षकांनी दिल्या आणि अशातच एक मोठा धक्का प्रेक्षकांना मिळाला आहे.

vishakha subhedar and sameer chaugule
दर दहा वर्षांनी सैफ होतोय बाबा, करीना म्हणतेय, आता तरी थांबा..

याबाबत विशाखा सुभेदार हिने आपल्या फेसबुक अकाउंटवर ये भाऊक पोस्ट लिहिली आहे. 'एक निर्णय' असे शीर्षक देऊन तिने आपले मनोगत मांडले आहे. तसेच अनेक आठवणींनांना उजाळा दिला आहे. विशाखा लिहिते,' नमस्कार मंडळी..अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅट मध्ये काम करतेय. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! २०११ मध्ये पहिलं पर्व विजेता जोडी,मांगले आणि मी.. ते आज २०२२ समीर विशाखा..असा मोठा प्रवास आहे. हा प्रवास खरंच सोपा नाहीय. मी काही फार मोठी विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिक पणे केलं. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करीत,त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केल. प्रत्येक स्किट मी जगले. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. 'Wet-cloud productions'च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आत्ता ह्याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले,'अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

पुढे ती म्हणते. कोणतंही काम करताना प्रचंड टेन्शन असतं मात्र आपलं काम चोख झालं की शांत चित्ताने दिग्दर्शकाचा " ओके " हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येतं. आत्ता हे "असं" काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे. आजवर तुम्ही हास्यजत्रेवर, माझ्यावर भरभरून प्रेम केलं. पण आता जरा धावपळ होतेय त्यामुळे थांबण्याचा विचार आहे. माझ्या या हास्य प्रवासात समीरने महत्वाची साथ दिली त्यामुळे त्याचे आभार. तुझ्यातल्या वेडेपणाला सलाम आहे माझा. या कार्यक्रमाने खूप माणसं जोडली गेली. पण भाकरी भाजली की टोपलीत काढावी, आंबे तयार झाले तर उतरवावेत तसेच हा प्रवास थांबवून नवं बी पेरण्याची गरज आहे. मला काही मोठं काम मिळालं नाहीय किंवा मी दुसरी मालिका करत नाही. फक्त आता वेगळ्या धाटणीचे काही करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या भूमिकेतून भेटू,' असे विशाखाने म्हटले आहे. त्यामुळे या पोस्ट नंतर आता विशाखाचा नवा अंदाज कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com