esakal | शुभमंगल '2' सावधान, ज्वाला-विष्णू नांदा सौख्य भरे...

बोलून बातमी शोधा

Vishnu Vishal Jwala Gutta tie the knot
शुभमंगल '2' सावधान, ज्वाला-विष्णू नांदा सौख्य भरे...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारताची स्टार महिला बॅटमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिध्द अभिनेता विष्णु विशाल यांचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. मोजक्या व्यक्तींच्या उपस्थित हा लग्नसोहळा झाला आहे. लग्नापूर्वी एक दिवस अगोदर हळदी आणि मेंहदीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळीही निवडक नातेवाईक या कार्यक्रमांना उपस्थित होते. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना दोघांच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवारी ज्वाला आणि विष्णु विशाल दोघेही विवाहबध्द झाले.

यासगळ्यात ज्वालानंही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्या फोटोंमध्ये ज्वाला आणि विष्णु यांचा वेगळा लूक दिसून येतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या दोघांनी तातडीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्वालानं जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यात तिनं यलो कलरचा ड्रेस परिधान केला आहे. त्याला मॅचिंग अशी ज्वेलरीही तिनं घातली आहे. दुसरीक़डे नवरदेव विष्णु विशालनं कुर्ता पायजमा आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे. त्याचाही लुक त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल ठरत आहे. या दोघांनी आपल्या लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेतल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर त्याविषयी माहितीही शेअर केली होती. तेव्हापासून दोघांच्याही चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता होती. अनेक काळापासून ते एकमेकांना डेट करत होते. 22 एप्रिलला लग्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले होते. या दोन्ही सेलिब्रेटींचा हा दुसरा विवाह आहे. विष्णु विशाल हा तमिळ अभिनेता आहे. त्याने 2009 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2011 मध्ये त्याचे लग्न रजनी नटराजनशी झाले होते. मात्र त्यानंतर ते वेगळे झाले. ज्वालाचेही बॅटमिंटन खेळडू चेतन आनंद यांच्याशी लग्न झाले होते.