Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीने विकत घेतले १७.९२ कोटींचे घर; मुद्रांक शुल्क किती भरले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri Latest News

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीने विकत घेतले १७.९२ कोटींचे घर

Vivek Agnihotri Latest News चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि पत्नी पल्लवी जोशी यांनी मिळून मुंबईच्या वर्सोवा भागात प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत १७ कोटी ९२ लाख आहे. विवेक अग्निहोत्री ब्लॉकबस्टर हिट चित्रपट द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक आहे. त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी या चित्रपटात पैसे गुंतवले होते.

दोघांनी ही प्रॉपर्टी एक्स्टेसी रियल्टी या प्रोजेक्टच्या डेव्हलपरकडून विकत घेतली आहे. अहवालानुसार, अपार्टमेंट इमारतीच्या ३०व्या मजल्यावर आहे. त्याचा आकार ३,२५८ स्क्वेअर फूट आहे. या अपार्टमेंटसोबत तीन कार पार्किंग स्लॉटही उपलब्ध असतील. एका बातमीनुसार, विवेक आणि पत्नीने १ कोटी ७ लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.

हेही वाचा: Adipurush : आदिपुरुष फ्लॉप होण्याची शक्यता अधिक? टीझर पाहताच ५ कारणे आली समोर

स्क्वेअर फूटचा विचार केला तर फ्लॅटची किंमत ५५ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. मालमत्तेची कागदपत्रे आणि तपशील Indextap.com वर उपलब्ध आहेत. काश्मिरी पंडितांवर मुस्लिमांच्या अत्याचाराची कथा मांडणारा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि चित्रपटाने ३४० कोटींहून अधिक कमाई केली.

चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि भाषा सुंबळी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. जर तुम्ही हा चित्रपट मिस केला असेल तर OTT प्लॅटफॉर्म ZEE५ वर उपलब्ध आहे. तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असल्यास तुम्ही हा चित्रपट विनामूल्य पाहू शकता.

टॅग्स :vivek agnihotri