Vivek Agnihotri: तीन गोष्टी बॉलीवूडसाठी सगळ्यात धोकादायक! पुन्हा कडाडून टीका |Vivek Agnihotri the Kashmir files director comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vivek agnihotri

Vivek Agnihotri: तीन गोष्टी बॉलीवूडसाठी सगळ्यात धोकादायक! पुन्हा कडाडून टीका

Bollywood News: काश्मिर फाईल्समुळे सर्वांना माहिती झालेल्या विवेक अग्निहोत्रींचा आता देशातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये समावेश करावा (The kashmir files director vivek agnihotri) लागेल. वास्तविक काश्मीर फाईल्सपूर्वी देखील त्यांनी ज्या चित्रपटांची निर्मिती केली ती देखील प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्या चित्रपटांवरुन देखील त्यांना वादाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र सर्वाधिक (bollywood celebrity) वाद झाला तो काश्मीर फाईल्समुळे. देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी काश्मीर फाईल्सवर आपली प्रतिक्रिया दिली होती. देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्या चित्रपटावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नव्हता.

आता पुन्हा एकदा फिल्ममेकर अग्निहोत्री हे चर्चेत आले आहे. त्यांनी बॉलीवूड, त्यातील वाद, त्यामधील घराणेशाही आणि काही बडया कलाकारांवर सडकून टीका केली आहे, अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेमुळे चर्चेत असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा जो वाद रंगला होता त्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी खान कलाकार मंडळींवर त्यांनी निशाणा साधला होता. या अभिनेत्यांनी कधीच आपल्या चित्रपटांविषयी भूमिका मांडली नाही. त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. असे म्हटले होते.

अग्निहोत्री यांनी सोशल मीडीयावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, आपल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी मोदीजींच्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. यावेळी मोदीजींनी देशातील राजकारण, त्या राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली आहे. त्याचा आधार घेत अग्निहोत्रींनी बाजु मांडली आहे. ते म्हणातात, नैतिक भ्रष्टाचार, मामा- भाच्यांमधील वाद, भाईंमधील संघर्ष, आणि हिंदू फोबिया या तीन गोष्टी बॉलीवूडसाठी मारक असल्याचे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Bollywood Mother-Daughter: बॉलिवूडमधल्या प्रसिध्द मायलेकी

भाई - पुतण्या, भाचा वाद हा तर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी अग्निहोत्रींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, उगाचच वाद क्रिएट करुन बॉलीवूडला बदनाम करणाऱ्यांमध्ये अग्निहोत्री हे नेहमीच आघाडीवर असतात.

हेही वाचा: Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan: 'आमीर - अक्षय' दोघंही गोत्यात!

Web Title: Vivek Agnihotri The Kashmir Files Director Comment On Bollywood Mafia Nepotism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..