विवेक अग्निहोत्री 'हाजीर हो'! कोर्टाचा अवमान करणं भोवलं?| Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री 'हाजीर हो'! कोर्टाचा अवमान करणं भोवलं?

Vivek Agnihotri Case : द काश्मिर फाईल्स या चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांना आता दिल्ली हायकोर्टानं १० एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या परखड आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अग्निहोत्रींना कोर्टानं हजर होण्यास सांगितल्यानं चर्चेला उधाण आले आहे.

काश्मीर फाईल्स या चित्रपटातून काश्मीरी पंडित आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या अग्निहोत्रींना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दिल्ली कोर्टानं हजर राहण्याचे आदेश दिले आहे. २०१८ सालच्या एका भीमा कोरेगाव प्रकरणातील आदेशाबाबत अग्निहोत्री यांनी केलेलं वक्तव्य त्यांना भोवल्याची चर्चा आहे. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना आता कोर्टानं हजर राहण्यास सांगितले असून त्यावर त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

संबंधित प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळेस दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी कोर्टाची माफीही मागितली होती. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणावर न्यायाधीश एस मुरलीधर यांनी त्या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखालाबाबत जो निर्णय़ दिला त्याबाबत अग्निहोत्री यांनी टिप्पणी केली होती. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत न्यायालयानं पक्षपात केल्याचे म्हटले होते. त्यावरुन आता न्यायालयानं त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

गौतम नवलाखा यांना अटक आणि पोलीस कोठडीपासून संरक्षण यापासून कोर्टानं संरक्षण दिलं होतं. त्यावर काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी न्यायाधीश एस मुरलीधर यांच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली होती. कोर्टानं अग्निहोत्री यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांच्याविरोधात आणि रायटर आनंद रंगनाथन आणि एका न्युज पोर्टलच्या विरोधात अवमान केल्याप्रकरणी कार्यवाही सुरु केली होती. आता या प्रकरणावर १० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्सनं देशभर खळबळ उडवून दिली होती. वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात आला होता. वादग्रस्त चित्रपट म्हणून त्याची सगळीकडे चर्चा झाली. अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका होत्या.