Vivek Agnihotri: 'सगळं मुर्खासारखं सुरू होतं..', बॉलीवूडच्या कलाकारांवर का भडकले अग्निहोत्री?

विवेक अग्निहोत्री अनेकदा ट्वीट करुन नवा मुद्दा उखडून काढत असतात. सध्याची त्यांची पोस्टही ट्वीटरवर व्हायरल होतेय.
Vivek Agnihotri
Vivek AgnihotriEsakal

Vivek Agnihotri: कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलीवूडमधल्या बड्या सेलिब्रिटींनी यावर्षी पदार्पण केलं. त्यानंतर आता निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच एक ट्वीट करत बॉलीवूडवर निशाणा साधला आहे आणि म्हटलं की,''कान्स फिल्म फेस्टिव्हल सिनेमांच्या प्रीमियरसाठी होतो..कोणता फॅशन शो नाही हा''.

आता पुन्हा एकदा यावर मूग गिळून बसलेल्या इंडस्ट्रीतील अनेकांवर अग्निहोत्रींनी आपला राग काढला आहे..आणि बॉलीवूड कलाकारांना चांगलं झापलं आहे.(Vivek Agnihotri tweet against bollywood industry cannes film festival)

Vivek Agnihotri
R Madhavan Birthday: यावर्षी वाढदिवसाला माधवन करणार 'ही' आवडती गोष्ट.. म्हणाला..
Vivek Agnihotri
Katrina-Vicky First Meet Video Viral: समोर आला कतरिना-विकीचा पहिल्या भेटीचा व्हिडीओ..पाहताच अभिनेत्रीला म्हणाला होता..

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमांपेक्षा अधिक लोकांच्या फॅशनची अधिक चर्चा होते हे म्हणत बॉलीवूडच्या कलाकारांवर ताशेरे ओढले जे या सगळ्यावर भाष्य करण्यापासून लांब राहतात.

अग्निहोत्री म्हणाले,''त्या सगळ्या बॉलीवूडमधील लोकांचे म्हणणे होते की ते सगळे ब्रॅन्डला प्रमोट करण्यात बिझी आहेत म्हणून गप्प बसावं लागतं. जसं आपण एखाद्या लग्नात परफॉर्म करता आणि त्याचे पैसे घेता,तेव्हा तुम्ही लग्नातील जेवणाला नावं नाही ठेवू शकत. त्यांचं अस्तित्व अशावेळी शून्य किमतीचं होतं''.

Vivek Agnihotri
Sonakshi Sinha: सोनाक्षीचा गृहप्रवेश..पाहिलंत का वरळीचं तिचं नवं घर?

अग्निहोत्री यांच्या मते बॉलीवूडचे कलाकार आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनले आहेत,म्हणून ते आता अभिनय करत नाहीत. त्यांच्यासाठी हे जीवन खूप मस्त आहे. अग्निहोत्री यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये इन्फ्लुएन्सर्सच्या उपस्थितीतीवर देखील कटाक्ष टाकला आणि म्हटलं की, ''त्यांना खूप लाइमलाइट मिळालं आहे. मला कळत नाही या इन्फ्सलुएन्सर्सचा सिनेमाशी काय संबंध आहे? हे आपण प्रेक्षकांसोबत चुकीचं करत होतो कारण फेस्टिव्हलमध्ये सगळंच मुर्खासारखं सुरु होतं''.

Vivek Agnihotri
Neha Marda: 'बाळाला वाचवू की आईला..', अभिनेत्री नेहा मर्दानं सांगितला डिलीव्हरीचा मनाला सुन्न करणारा प्रसंग..

विवेक अग्निहोत्रींच्या हे लोक फेस्टिव्हलचा मूळ उद्देशच संपुष्टात आणत आहेत. कुणाल फेस्टिव्हलचा हेतू नेमका काय आहे याच्याशी काहीच घेणंदेणं नाही. तिथे कोणालाच माहित नव्हतं की कोणता सिनेमा दाखवला जातोय,कोणत्या कॅटेगरीत कोणी बाजी मारली.

आपण कोणाच्या क्षमतेवर बोट नाही ठेवत पण जे कलाकार कान्समध्ये उपस्थित होते त्यांचा कोणाचा सिनेमा तिथे दाखवला गेला नाही. काही जण जे तिथे गेले होते त्यांचा तर गेल्या काही वर्षात एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com