शिवसेना,कॉंग्रेस,आप अनेकांना इम्युनिटी वाढवायचा अग्निहोत्रींचा खोचक सल्ला Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivel Agnihotri reveals release date of 'The kashmir Files' sequel- 'The Delhi Files'

शिवसेना,कॉंग्रेस,आप अनेकांना इम्युनिटी वाढवायचा अग्निहोत्रींचा खोचक सल्ला

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमानं संपू्र्ण देशाला हलवून सोडलं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. सिनेमा प्रदर्शनाआधी पासून जो चर्चेत राहिला तो अजूनही अधन-मधनं यासंदर्भातले वाद डोकं वर काढताना दिसतात. आता सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) या सिनेमाचा सीक्वेल घेऊन येत आहेत. 'द काश्मिर फाईल्स' मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी ९० सालातील काश्मिरी पंडितांचा पलायनवाद,त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारावर भाष्य करत मोठ्या पडद्यावर ते दाखवण्याचं धाडस केलं होतं. सिनेमाला पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आता विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मिर फाईल्स २' सिनेमाचा सिक्वेल काढण्याचं ठरवलं असून याचं नाव 'द दिल्ली फाईल्स' ठेवलं आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मिर फाईल्स' च्या सीक्वेलची माहिती देताना ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काही पक्षांना,अतिरेकी संघटंनांना डिवचत आपण त्यांना नाराज करणार नाही असं देखील म्हटलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर लिहिलं आहे की,''खूप साऱ्या दहशतवादी संघटना,पाकिस्तानी लोक,कॉंग्रेस,आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसंच अर्बन नक्षलवादी देखील मला 'द काश्मिर फाईल्स २' संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा''. विवेक अग्निहोत्री यांचे हे खोचक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

विवेक अग्निहोत्रींनी सांगितलं की 'द काश्मिर फाईल्स पार्ट २' चं नाव 'द दिल्ली फाईल्स'(The Delhi Files) असेल. हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द काश्मिर फाईल्स' ११ मार्च,२०२२ रोजी प्रदर्शित झाला होता . फक्त २५ करोड मध्ये बनलेल्या या सिनेमानं २५० करोड कमावले होते. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी, दर्शन कुमार,मिथुन चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या होत्या. एकीकडे काही लोकांनी सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं तर दुसरीकडे अनेकांनी सिनेमाची प्रतारणा देखील केली. प्रकाश राज पासून नाना पाटेकर पर्यंत कितीतरी बड्या सेलिब्रिटींनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाला नावं ठेवली. हा सिनेमा समाजात फूट पाडतोय असं दखील म्हटलं गेलं.

विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचा सीक्वेल 'द दिल्ली फाईल्स' विषयी एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्यांचा हा सिनेमा १९८४ मधी एका डार्क साइडवर आधारित आहे. ज्यामध्ये १९८४ मधील शिख लोकांशी झालेला धोका,दंगल,त्यामागचं सत्य दाखवलं जाईल. तसंच तामिळनाडूशी संबंधित एका सत्याचा देखील समोर आणलं जाईल.