वाजिद खान यांचा हॉस्पिटलमधील 'तो' व्हिडिओ अखेरचा म्हणून व्हायरल..

wajid khan viral video
wajid khan viral video

मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद या जोडीमधील वाजिद खान यांच आज निधन झालं. किडनी आणि हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या वाजिद यांची उपचारा दरम्यान टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याच समोर आलं. त्यांच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोकाकुल वातावरण आहे. याचदरम्यान आता वाजिद यांचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांना ओळखणंही कठीण आहे. 

वाजिद यांचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ४४ सेकंदचा असून यात वाजिद हॉस्पिटलच्या बेडवर बसून 'हुड हुड दबंग' हे गाणं गात आहेत. गाणं गाताना ते थोडे अडकत असल्याचं दिसत असलं तरी ते हसत हसत हे गाणं गात आहेत. इतकंच नाही तर गाण्याच्या शेवटी त्यांनी 'लव्ह यू ब्रदर' असं देखील म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांच्या स्थितीवरुन ते आजारपणामुळे खूपंच अशक्त झाल्याचं दिसून येतंय. हा व्हिडिओ त्यांच्या निधनानंतर अखेरच्या क्षणांचा असल्याचं म्हटलं जात होतं  मात्र हा व्हिडिओ जुना असल्याचं कळतंय.

वाजिद हे सलमान खानला त्यांचा गॉडफादर मानत होते. साजिद-वाजिद या जोडीला सलमानने त्याच्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमातील गाण्यांमधून ब्रेक दिला होता. तेव्हा पासून ही जोडी सलमानसाठी अनेकदा संगीतकार म्हणून उभी राहिली आहे. सलमानसोबतंच 'भाई भाई' हे लॉकडाऊनमधलं वाजिद यांचं शेवटचं गाणं होतं. दबंग सिनेमातील त्यांची गाणीही प्रेक्षकांमध्ये खूप गाजली आहेत. म्हणूनंच शेवटच्या क्षणीही वाजिद भाईजानच्या 'दबंग' सिनेमातलं त्यांचं आवडतं गाणं 'हुड हुड दबंग' गाताना दिसत आहेत. या गाण्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण केलीये. 

वाजिद यांनी सलमानसाठी 'दबंग', 'दबंग २', 'दबंग ३', 'एक था टायगर', 'वॉन्टेड', 'पार्टनर', 'गॉड तुसी ग्रेट हो', 'वीर' सारख्या अनेक सिनेमांमध्ये गाण्यांना संगीत दिलंय आणि गायलं देखील. याशिवाय 'सन ऑफ सरदार', 'रावडी राठोड', 'हाऊसफुल्ल २' सारख्या सिनेमांमधील त्यांची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.   

wajid khan video singing hud hud dabangg in hospital viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com