अक्षय कुमारने बहिणीच्या प्रवासासंदर्भातील बातम्या खोट्या असल्याचा केला दावा, म्हणाला..

akshay kumar
akshay kumar

मुंबई- लॉकडाऊनमध्ये देशांतर्गत विमानसेवा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. असं असतानाच नुकतीच अक्षय कुमारच्या बहिणीसंदर्भात देखील एक बातमी समोर आली होती. अक्षय कुमारने त्याच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलांसाठी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी विमानातील त्यांच्या आजुबाजुच्या काही सीट्स बुक केल्याचं या बातमीमध्ये म्हटलं होतं. मात्र अक्षय कुमारने नुकतंच या बातम्यांचं खंडन केलं आहे आणि याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

अक्षय कुमारने रविवारी त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन जाहीर केलं की, 'माझी बहीण आणि तिच्या मुलांसाठी एक चार्टर विमान बुक केल्याची बातमी पूर्णतः चुकीची आहे. तिने लॉकडाऊननंतर कुठेच प्रवास केलेला नाही आणि तिला एकंच मुलगा आहे. खोट्या आणि चुकीच्या बातम्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मी विचार करतोय.' 

काय होती बातमी?

या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, अक्षय कुमार कोरोना व्हायरसमुळे त्याच्या कुटुंबाबाबत रिस्क घेऊ इच्छित नाही. यासाठी त्याने बुक केलेल्या सीटच्या आजुबाजुच्या काही एक्स्ट्रा सीट्स देखील खबरदारीचा उपाय म्हणून बुक केल्या होत्या. मुंबईहून दिल्लीला जाणा-या या विमानात केवळ चार लोकांनी प्रवास केल्याचं म्हटलं गेलं होतं. यात अक्षयची बहीण अलका, तिची दोन मुलं आणि त्यांची सहाय्यक यांचा समावेश असल्याची चर्चा होती. 

मात्र अक्षयने नुकतंच याबाबत ट्वीट करत ही संपूर्ण बातमीच खोटी असल्याचं स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर त्याने अशा खोट्या बातम्या पसरवणा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्याच्या ट्वीटमधून दिल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नेमकी अक्षयच्या टीममधून ही बातमी कोणी दिली याविषयी चर्चा होतेय.

akshay kumar said that booking a flight for his sister and her two kids is false news  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com