
Kiara Advani Joined War 2 Cast: गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या बॅनरखाली बनवल्या वॉर 2 बद्दल बरीच चर्चा आहे.
हृतिक रोशनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट वॉरच्या दुसऱ्या भागासाठी त्याने साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत हात मिळवला आहे.
ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी त्याने याचा खुलासा केला. त्यातच आता पुन्हा या एक लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणीनेही या चित्रपटात ग्रँड एन्ट्री केल्याच्या बातम्या समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणीला निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या स्पाय युनिव्हर्स अंतर्गत बनवल्या जाणार्या वॉर चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली आहे.
कियारा अडवाणी YRF Spy Universe ने यशराज फिल्म्ससोबत करार केला आहे. लवकरच वॉर 2 चे शूटिंग सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार YRF स्पाय युनिव्हर्स आणि वॉर 2 च्या बाबतीत कियारा अडवाणी पूर्णपणे फिट आहे.
YRF Spy Universe हा एक था टायगर, टायगर जिंदा है, वार आणि पठाण सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा एक लीग आहे. कियाराची लोकप्रियता पाहता तिची या चित्रपटात निवड करण्यात आल्याच बोलल जात आहे.
कियारा अडवाणीने तिच्या 8 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये बॉलीवूडला 7 हिट चित्रपट दिले आहेत.
'जुग जुग जिओ' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती आणि आता ती तिच्या पुढच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटासाठी चर्चेत आहे.
या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.