Hrithik Roshan: सलमाननंतर आता हृतिकची सुद्धा साऊथशी हातमिळवणी..! 'WAR 2' मध्ये झळकणार 'हा' साउथ सुपरस्टार

‘RRR’ Star NTR Jr comes on board with Hrithik Roshan in Spy Universe Film ‘War 2’
‘RRR’ Star NTR Jr comes on board with Hrithik Roshan in Spy Universe Film ‘War 2’Esakal

Hrithik Roshan : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ग्रीक-गॉड' म्हणजेच हृतिक रोशन आणि टाइगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी 'वॉर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाशी निगडीत लहानसहान अपडेटची चाहत्यांचा उत्साह वाढवतो.

त्याच वेळी, आता या चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'वॉर 2' मध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सूकता आणखीणच वाढणार आहे.

वॉर 2 च्या सीक्वलचे दिग्दर्शनाची जबाबदारी अयान मुखर्जीवरला देण्यात आली आहे. अशी नवी अपडेट नुकतिच चाहत्यांना मिळाली. मात्र आता या चित्रपटाशी संबधित आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

ती म्हणजे या चित्रपटात साउथ सुपरस्टार आरआरआर फेम ज्यूनिअर NTRदेखील दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘RRR’ Star NTR Jr comes on board with Hrithik Roshan in Spy Universe Film ‘War 2’
Adipurish: 'आदिपुरुष'चा वनवास काही संपेना! दिग्दर्शक आणि कलाकरांविरोधात FIR दाखल..

मनोरंजन विश्वात YRF Spy Universeने त्यांची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता याच Spy Universe च्या फ्रँचायझीचा सुपरहिट चित्रपट 'वॉर' चा दुसरा भाग हा लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.

आता त्याच चित्रपटात जूनियर एनटीआर देखील दिसणार आहे. तो हृतिक रोशनच्या विरुद्ध या चित्रपटात दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘RRR’ Star NTR Jr comes on board with Hrithik Roshan in Spy Universe Film ‘War 2’
Bholaa Box Office Collection: अजय देवगणच्या 'भोला'ने 50 कोटींचा आकडा केला पार, जाणून घ्या सहाव्या दिवसाची कमाई

चित्रपट विश्लेषक तरण आदर्शच्या मते, ज्युनियर एनटीआरची 'वॉर 2' मध्ये एंट्री झाली आहे. तो पहिल्यांदाच हृतिक रोशन (हृतिक रोशन vs एनटीआर) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आता दक्षिणेचा पॉवर स्टार ज्युनियर एनटीआर देखील या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे.

ज्युनियर एनटीआर बद्दल बोलायचं झालं त्याची क्रेझ फक्त साउथलाच नव्हे तर पुर्ण जगभर पसरली आहे. त्याचबरोबर नुकताच त्याच्या आरआरआर या चित्रपटाला जागतिक स्तरावर बहूमान मिळाला आहे.

आरआरआरने ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्येही मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे आता याचा फायदा नक्कीच टाइगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या वॉर या चित्रपटाला होणार यात काहीच शंकाच नाही. मात्र याविषयी चित्रपटाच्या टिम कडून अजून काही अधिकृत माहिती आलेली नाही.

‘RRR’ Star NTR Jr comes on board with Hrithik Roshan in Spy Universe Film ‘War 2’
Citadel Premiere: रेखापासून वरुण धवनपर्यंत या स्टार्सनी प्रियांकाच्या ‘Citadel’ या सिरीजच्या प्रीमियरला लावली हजेरी

NTR ज्युनियर सध्या त्याच्या 30 चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्याचे नाव "NTR 30" आहे. ज्याला कोरटाला शिवा दिग्दर्शित करत आहे. ज्यात जान्हवी कपुर देखील दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com