राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री

Competition Of Rural Artists
Competition Of Rural Artists

कोल्हापूर  -  जिल्ह्याच्या अनेक गावांत आजही ग्रामीण नाट्य परंपरा जपली गेली आहे. मात्र, अशी नाटकं करणारी मंडळी फारशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत नाहीत. सादळे, भुयेवाडी, शिये परिसरातील अशाच ग्रामीण कलाकारांनी यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच दमदार एंट्री केली.

स्पर्धेच्या नियमानुसार सहभागी संस्थेची अधिकृत नोंदणी असावी लागते. त्याचमुळे मग गावातील श्री सिद्धेश्‍वर सहकारी दूध संस्थेच्या बॅनरखाली या मंडळींनी ‘वारणेचा वाघ’ हे अस्सल ग्रामीण बाजातलं नाटक स्पर्धेत सादर केलं. दूध संस्था म्हणजे गावातली डेअरी. साहजिकच डेअरीच्या या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ ग्रामीण कलाकारांचा नाट्यजल्लोष अनुभवायला मिळाला. 

ग्रामीण भागातील कलाकारांना ग्रामीण साहित्याची भुरळ

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं बहुतांश साहित्य ग्रामीण भागावरचं. साहजिकच त्यांच्या या साहित्यावर आधारित अनेक नाटकं, चित्रपट यापूर्वी आले. ‘वारणेचा वाघ’ ही कलाकृती याच परंपरेतील. खर तर हे नाटक काही आजच्या काळातलं नसलं तरी वर्तमानातील सामाजिक परिस्थितीशी नक्कीच त्याचा धागा कुठे ना कुठे जुळला आहे आणि म्हणूनच आजही ग्रामीण भागातील कलाकारांना या नाटकाची भुरळ कायम आहे. 

व्यक्तिरेखांची वयं साठीच्या पुढची 
नाटकात एकूण नऊ मुख्य व्यक्तिरेखा. मात्र, त्यातील सर्व प्रमुख व्यक्तिरेखांची वयं जरी बघितली तर ती साठीच्या पुढची. दिग्दर्शक नाना पाटील (गुरुजी) यांचं वय तर ७२. त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांसह नव्या पिढीतील कलाकारांची मोट बांधून हा प्रयोग स्पर्धेत आणला. या कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाजू आणि एकूणच स्पर्धेतील प्रयोग अशा विविध अंगांनी नाटकातील काही उणिवाही जरूर दाखवल्या जातील. पण, त्याच्याही पेक्षा या वयातही तितक्‍याच सळसळत्या ऊर्जेनं ही मंडळी नाटक सादर करतात. अक्षरशः जगतात, ही गोष्ट नक्कीच साऱ्यांना मोठा आत्मविश्‍वास देणारी. 

  लेखक : हरिश्‍चंद्र पाटील
  दिग्दर्शक : नाना पाटील
  प्रकाश योजना : संतोष तोरसे
  नेपथ्य : रघुनाथ लोले
  रंगभूषा : राजेंद्र शिंदे
  संगीत :आनंद ढेरे

पात्र परिचय...
नाना पाटील-गुरुजी (शिवा), प्रकाश शिंदे (रंगराव), विक्रम पाटील (तात्याबा), रवी पाटील (जग्या), दिलीप पारगावे (नाना), दगडू शिंदे (मायकल), बबन पाटील (कृष्णा), प्रकाश पाटील (गोपाळ), शीतल भोसले (चंद्रा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com