भारतात HBO आणि WB TV चॅनेल होणार बंद

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनूसार, आता केबल सबस्क्रिप्शनची किंमत आता सरासरी 4 ते 5 डॉलर इतकी झाली आहे. साधारण ती डिसेंबर 15 पासून सुरु होईल. मात्र भारतात HBO आणि WB TV चॅनेलच्या सबस्क्रिप्शची किंमत ही 2 डॉलरपेक्षाही कमी आहे. याचा कंपनीला तोटा होताना दिसत आहे.

मुंबई - कोरोनाचा फटका हळुहळू मनोरंजन क्षेत्राला बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक मोठ्य़ा कंपन्यांनी भारतातील आपला पसारा आवरायला घेतला आहे. विेशेषत; तरुणाईमध्ये लोकप्रिय असणा-या HBO आणि WB TV चॅनेल आता बंद होणार असल्याचे त्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारत सोडून इतर आशियायी देशांची बाजारपेठ शोधण्यावर कंपनी भर देणार आहे.

व्यापार आणि तंत्रज्ञानविषयक माहिती देणा-या एका दैनिकाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. येत्या काही महिन्यात HBO आणि WB TV चॅनेल हे भारतात दिसणार नाहीत. तसेच पाकिस्तान, मालदिव आणि बांग्लादेशला देखील त्य़ाचा फटका बसणार आहे. या टीव्ही चॅनेल कंपन्यांना एकप्रकारचा शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधायचा असल्याने त्यांनी या देशांमधील आपली गुंतवूक आणि त्या चॅनेलचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक दशकाहून अधिक काळ भारतात HBO आणि WB TV चॅनेलनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनूसार, आता केबल सबस्क्रिप्शनची किंमत आता सरासरी 4 ते 5 डॉलर इतकी झाली आहे. साधारण ती डिसेंबर 15 पासून सुरु होईल. मात्र भारतात HBO आणि WB TV चॅनेलच्या सबस्क्रिप्शची किंमत ही 2 डॉलरपेक्षाही कमी आहे. याचा कंपनीला तोटा होताना दिसत आहे. अमेरिकेत ज्या प्रमाणे घरोघरी HBO हा चॅनेल पाहिला जातो तशी परिस्थिती येथे नाही. तशी बाजारपेठही नसल्याने अडचणी अधिक आहे. भारत आणि इतर दक्षिण आशियायी देशांमधील चॅनेलची बाजारपेठही अतिशय लहान आहे. त्याता व्यापक परिणाम कंपनीवर होतो आहे. मुव्हिज नाऊ, स्टार मुव्हिज, सोनी पिक्स या वाहिन्यांना HBO च्या तुलनेत अधिक प्रेक्षक मिळाल्याचे दिसून आला आहे. मागील महिन्यातील ही आकडेवारी असून ती ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने प्रकाशित केली आहे.

जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ देशात सेवा दिल्यानंतर आमच्याकडून एका वेगळ्या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे. वास्तविक अशाप्रकारचा निर्णय घेणे आम्हाला जड जात आहे. सध्या चॅनेल स्ट्रिमिंग या माध्यमातही काही बदल होत आहे. विशेष म्हणजे यात कोरोनाचा उल्लेख करावा लागेल. त्याने मोठे संकट उभे केले आहे. अशी प्रतिक्रिया वॉर्नर मीडिया इंटरटेनमेंन्ट नेटवर्कच्या साऊथ एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सिध्दार्थ जैन यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warner Media to discontinue HBO and WB TV channels in India