esakal | 'कयामत से कयामत तक'चे हटके प्रमोशन; पहा तरुण आमिरचा भन्नाट व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan

'कयामत से कयामत तक'चे हटके प्रमोशन; पहा तरुण आमिरचा भन्नाट व्हिडीओ

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांचे बजेट कोटींच्या घरात असते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्माते कोट्यवधी रूपये खर्च करतात. पण 90 च्या दशकात चित्रपटांचे बजेट खूप कमी असायचे. प्रमोशन न करता देखील 90च्या दशकातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकोर्ड ब्रेक कमाई केली होती. अशाच एका एव्हरग्रीन चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमिर खानचा Aamir khan 'कयामत से कयामत तक' Qayamat se qayamat tak या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे आमिरने हटक्या प्रकारे प्रमोशन केले होते. आमिर आणि अभिनेता राजेंद्रनाथ ज़ुत्शी यांचा कयामत से कयामत तक'च्या प्रमोशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Watch a young Aamir Khan stick posters of Qayamat Se Qayamat Tak on auto rickshaws)

एका मुलाखतीमध्ये आमिरने या चित्रपटाच्या प्रमोशनचा किस्सा सांगितला. या व्हिडीओमध्ये आमिर 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाचे पोस्टर मुंबईमधील रिक्षांवर चिटकवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आमिर रस्त्यावर येणाऱ्या रिक्षांना अडवून रिक्षावाल्यांना चित्रपटाचे पोस्टर दाखवताना दिसत आहे. मुलाखतींमध्ये त्याने सांगितले,'राजेंद्रनाथ, मी, मनसूर आणि त्याची बहीण नुजात त्या दिवशी मुंबईमध्ये रस्त्यावर उतरून चित्रपटाचे प्रमोशन केले. आम्ही सर्वांनी आमच्या कारमधून उतरून रस्त्यावरील रिक्षांना आणि टॅक्सींना अडवले. आम्ही प्रत्येक वाहन चालकाला विचारत होतो की, आम्ही या चित्रपटाचे पोस्टर तुमच्या गाडीवर लावू शकतो का? काहींनी आम्हाला पोस्टर लावायला परवानगी दिली तर काहींनी नकार दिला. अनेक जण मला विचारत होते. कोणता चित्रपट आहे? आमिर खान कोण आहे? त्यांना मीच या चित्रपटाचा हिरो आहे असे सांगत होतो.'

हेही वाचा: आरोह वेलणकरने पहिल्यांदा पोस्ट केला मुलाचा फोटो; तुम्ही पाहिलात का?

हेही वाचा: 'ही राक्षसी वृत्ती'; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान-परिणीतीचा संताप

आमिरच्या चाहत्यांना हा तरूणपणीचा आमिर पाहुन आश्चर्य झाले. एका मुलाखतीमध्ये आमिरने सांगितले, 'मी कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी फक्त 11 हजार रूपये घेतले होते.' हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला होता. आमिरचा हा पहिला हिट चित्रपट आहे. चित्रपटामधील जुही आणि आमिरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर इश्क, हम है राही प्यार के या चित्रपटांमध्ये आमिर आणि जुहीने एकत्र काम केले.

loading image
go to top