तोडबाज ट्रेलर: ‘मसीहा’च्या भूमिकेत रिफ्युजी कॅम्पमधील मुलांना क्रिकेट शिकवतोय संजय दत्त

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

संजय दत्त आणि नर्गिस फाकरी या दोघांचा तोडबाज हा सिनेमा ११ डिसेंबरला नेटफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारआहे. हा सिनेमा गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे.

मुंबई- अभिनेता संजय दत्त नुकताच कॅन्सरवर उपचार घेऊन परतला आहे. यानंतर त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात देखील केली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सडक २च्या ट्रेलरनंतर आता संजय दत्तच्या आगामी 'तोडबाज' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.  संजय दत्त आणि नर्गिस फाकरी या दोघांचा 'तोडबाज' हा सिनेमा ११ डिसेंबरला नेटफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारआहे. हा सिनेमा गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे.

हे ही वाचा: 'बिग बॉस'च्या घरात अटीतटीची स्पर्धा, याआधी काम्या-संग्राम लहानशा खोक्यात होते ४१ तास बंद    

संजय दत्तने माजी आर्मी डॉक्टर नसीर खान हे पात्र साकारलं आहे. अफगाणिस्तानच्या रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलांना क्रिकेट शिकवण्याचं काम तो करताना दिसतो आहे. अफगाणिस्तानमधल्या रेफ्युजी कॅम्पच्या मुलांना कसं सुसाईड बॉम्ब बनवलं जातं आणि संजय दत्त मसीहा बनवून त्यांना कसं बदलतो हे या सिनेमात दाखवलं गेलं आहे. 

रेफ्युजी कॅम्पमधली मुलं दहशतवादी नसतात तर दहशतवादाची पहिली शिकार होतात हा संजुबाबाचा डायलॉग सध्या हिट होतोय. रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलांना संजय दत्त कसं प्रशिक्षण देतो त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी कसं तयार करतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात राहुल देव हा अभिनेता मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. लहान मुलंही सुसाइड बॉम्ब होण्यासाठीच आहेत अशी त्याची धारणा असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

तर नर्गिस फाकरीने एका अफगाणी महिलेचं पात्र साकारलं आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता सिनेमात काय काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. संजय दत्तचा या सिनेमातील भूमिकेतला लुकही हटके दिसतोय. ११ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होईल.

watch sanjay dutt nargis fakhri starrer torbaaz official trailer  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watch sanjay dutt nargis fakhri starrer torbaaz official trailer