esakal | 'ए मुली कंबर हलव' म्हणत बेबो करिनावर चिडल्या होत्या सरोज खान..
sakal

बोलून बातमी शोधा

kareena saroj khan

सरोज खान यांच्या कोरिओग्राफीमुळे बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री करिना कपूर हिचं. करिना आणि सरोज खान यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'ए मुली कंबर हलव' म्हणत बेबो करिनावर चिडल्या होत्या सरोज खान..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडला या वर्षात एकानंतर एक असे झटके मिळत आहे. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, सुशांत सिंह राजपूत आणि आता प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सरोज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सरोज खान यांना बॉलीवूडमध्ये मास्टरजी म्हणून सगळे हाक मारायचे. त्यांच्या कोरिओग्राफीमुळे बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री करिना कपूर हिचं. करिना आणि सरोज खान यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून एक मजेदार किस्सा समोर येतोय.

हे ही वाचा: वयाच्या १३ व्या वर्षात सरोज खान यांनी केलं होतं लग्न, मुलांच्या जन्मानंतर झाला 'या' धक्कादायक गोष्टींचा खुलासा

एका डान्स रिऍलिटी शोमधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये करिनाने सरोज खान यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे की त्या कशा प्रकारे डान्स शिकवायच्या. करिनाने सांगितलं की, एके दिवशी अर्ध्या रात्री सरोज खान यांना करिना कपूरच्या डान्स मुव्ह्ज पसंत पडत नव्हत्या. तेव्हा त्या करिनाला ओरडल्या. ऐ मुली कंबर हलव. करिनाने सांगितलं की सरोज खान तिला ओरडत म्हणाल्या होत्या, रात्रीचा एक वाजत आलाय तु काय करत आहेस? 

सरोज खान यांच्या जाण्याने करिना कपूर खूप दुःखी आहे. तिने सरोज यांच्यासोबत तिचा जुना फोटो पोस्ट करत लिहिलंय, 'मास्टरजी नेहमी मला सांगायच्या, पाय नाही चालवू शकत तर कमीत कमी चेहरा तरी हलव. डान्स ऍन्जॉय करता आला पाहिजे, हसलं पाहिजे आणि डोळ्यातून हसलं पाहिजे.बस्स एवढंच त्यांनी मला शिकवलं. त्यांच्यासारखं दुसरं कोणीच होऊ शकत नाही. आमच्या सारखे कलाकार जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी डान्स आणि हावभाव कधीच असे असू शकत नाहीत. लव्ह यू मास्टरजी. '

करिना कपूरने हे देखील सांगितलं की तिच्या आईने तिला एक सल्ला दिला होता तो म्हणजे 'जर तुला अभिनेत्री व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त सरोज खान यांची कोरिओग्राफ केलेली गाणी पाहिली पाहिजेत आणि त्यातून शिकलं पाहिजे.'  

watch video when saroj khan scolded kareena kapoor khan and said ae ladki kamar hila  

loading image
go to top