esakal | मनोरंजनाचा रविवार! पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड
sakal

बोलून बातमी शोधा

virajas kulkarni and gautami deshpande

'माझा होशील ना', 'होम मिनिस्टर', 'कारभारी लयभारी', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग

मनोरंजनाचा रविवार! पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड

sakal_logo
By
स्वाती वेमूल

 
येत्या रविवारी म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी झी मराठी वाहिनीवर 'होम मिनिस्टर', 'कारभारी लयभारी' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या प्रेक्षकपसंतीच्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग सादर होणार आहेत. 'होम मिनिस्टर'च्या विशेष भागात 'माझा होशील ना' लग्नविशेष पाहायला मिळेल. या भागात सई-आदित्यचं केळवण आणि मामांची धमाल पाहायला मिळणार आहे. आता सईला पैठणी कोण मिळवून देणार, सासरचे की माहेरचे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  
 
'कारभारी लयभारी' मालिकेत राजवीर आणि प्रियांका यांची मैत्री झाली. राजवीरला प्रियांकाच्या वागण्याबोलण्यातून आपण तिला आवडत असल्याचं कळतंय. खूप प्रयत्न करून तो प्रियांकाल प्रपोज करतो. आता त्यावर पियू काय उत्तर देणार, ती राजवीरच्या प्रेमाला होकार देणार का की वडील अंकुशराव पाटील यांना घाबरून राजवीरला कायमचं विसरले, याची उत्तर या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. 

हेही वाचा : सिद्धार्थ-मितालीने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील 'हे' सुंदर ठिकाण; जाणून घ्या किंमत

यंदाच्या रविवारी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पुरेपूर सोय करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता होम मिनिस्टर, दुपारी १ आणि रात्री ८ वाजता कारभारी लयभारी तर दुपारी २ आणि रात्री ९ वाजता माझ्या नवऱ्याची बायको प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.