पुन्हा एकदा हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी, ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

प्रियांका तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली असून ती लवकरच 'वी कॅन बी हिरोज' या हॉलिवूडपटात झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

मुंबई- ‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतंच ती अनेकदा तिच्या पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत असते. सध्या प्रियांका तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली असून ती लवकरच 'वी कॅन बी हिरोज' या हॉलिवूडपटात झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

हे ही वाचा: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची छापेमारी    

प्रियांकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या 'वी कॅन बी हिरोज' या सिनेमाची माहिती दिली असून सोबत टीझर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या टीझरमधून प्रियांका पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. रिलीज झालेल्या टीझरमधून सुपरहिरो आणि एलियन यांच्यातील युद्ध दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे सगळे सुपरहिरो लहान मुलं आहेत.

“सिनेमाचं शूटींग सुरु असताना फार मज्जा आली. दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रिग्ज आणि या लहान मुलांसोबत छान वेळ गेला. विशेष म्हणजे या मुलांच्या विरुद्ध भूमिका साकारण्याचा छान अनुभव मिळाला. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे”, असं कॅप्शन प्रियांकाने या टिझरला दिलं आहे.

दरम्यान, प्रियांका ‘द व्हाइट टायगर’ या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या सिनेमात प्रियांकासोबत राजकुमार राव मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे. तर हॉलिवूड मधील ‘मॅट्रिक्स 4’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ या सिनेमांमध्येही प्रियांका दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

we can be heroes teaser it is priyanka chopra vs super kids in robert rodriguez film  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we can be heroes teaser it is priyanka chopra vs super kids in robert rodriguez film