esakal | प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची छापेमारी
sakal

बोलून बातमी शोधा

bharti

एनसीबीने शनिवारी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीच्या घरी छापेमारी केली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची छापेमारी

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडमध्ये ड्रग्स कनेक्शनचा तपास करत असलेल्या एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने शनिवारी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीच्या घरी छापेमारी केली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पती पत्नीवर ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे. ड्रग्स पेडलर्स यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या घरी एनसीबीने छापेमारी केली आहे.  

हे ही वाचा: अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा बेरोजगार? सोशल मीडियावर मागतोय काम

एनसीबीच्या मुंबई विभागाने भारती सिंहच्या मुंबईच्या घरी छापेमारी केल्याचं कळतंय.सुत्रांच्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या पेडलर्सच्या चौकशीमधून ही बाब समोर आल्याने एनसीबीने ही कारवाई केली. एनसीबीची अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी सुरु होती. एनसीबीला या छापेमारीमध्ये भारती आणि हर्ष यांच्या या घरातून गांजा सापडला आहे. भारती सिंह टीव्ही अभिनेत्रींपैकी पहिलीच अभिनेत्री आहे जिच्या घरी एनसीबीने छापेमारी केली आहे. याआधी बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गेब्रिएलाच्या घरी एनसीबीने छापेमारी केली होती. 

ncb raid at famous comedian bharti singh home