esakal | आमच्यासाठी कोरोना आणि करीनासुद्धा; आमिर खान झाला ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

we were dealing with corona and kareena actor aamir khan share Memories of movie laal singh chaddha.jpg

सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं, तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो.' 

आमच्यासाठी कोरोना आणि करीनासुद्धा; आमिर खान झाला ट्रोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते दोघे लाल सिंग चढ्ढा या त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना माहिती देत होते. आमिरचा चाहता वर्ग मोठा आहे. एका चाहत्यांने त्याच्या युट्यूब चॅनलवर या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. 

बाळंतपणानंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे? वाचा अनुष्काच्या न्युट्रीशियनच्या टिप्स

मुलाखतीमध्ये आमिरची पत्नी किरण राव देखील सहभागी झाली होती. या व्हिडीओमध्ये आमिर म्हणतो,' जर परिस्थिती ठीक असेल, आम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. तर या वर्षीच्या अखेरपर्यंत चित्रपट प्रदर्शित होईल'. त्यानंतर किरण म्हणते, 'ख्रिसमस दरम्यान'. कोरोना महामारीच्या दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचे नियोजन केले होते. शुटिंगबाबत बोलताना आमीर म्हणाला, 'या काळात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यात करीनाने आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तिच्या गरोदरपणामुळे आम्हाला अधिक खबरदारी घेऊन चित्रीकरण करणं भाग होतं. त्यामुळे सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं, तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो.' 

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्निचे आयुष्य खडतर ; सांगितला अनुभव 

'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत करिना आणि आमिर दिसणार आहेत. या चित्रपटाचे शुटिंग मार्च 2019 मध्ये सुरू झाले. 'लाल सिंग चढ्ढा' हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाचा रिमेक आहे. 2020 मध्ये ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या मुलाखतीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

loading image