Mirzapur 3: 'मिर्झापूर 3'ची प्रतिक्षा संपली, गुड्डू भैय्याने शेअर केला व्हिडिओ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mirzapur 3
Ali fazal

Mirzapur 3: 'मिर्झापूर 3'ची प्रतिक्षा संपली, गुड्डू भैय्याने शेअर केला व्हिडिओ...

मिर्झापूर ही लोकप्रिय वेब सिरिज चाहत्यांचा जिव्हाळ्याचा विषयच बनली आहे. या वेबसिरिज संबधित नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ते उत्सूक असतात. पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांच्या या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अली फजलने याबद्दल एक नवीन अपडेट शेअर केले आहे जे खरोखरच चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. त्याने एक पोस्ट शेअर करून मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग संपल्याची माहिती दिली.

हे ही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Amazon Prime वर येणार्‍या सर्वात लोकप्रिय वेब सिरीजच्या पुढच्या सीझन 'मिर्झापूर 3' प्रेक्षक या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अखेर गुड्डू भैयाने शूटिंग संपल्यानंतर त्याची झलक शेअर केली आहे. सर्वात लोकप्रिय शो 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग संपताच अली फजलने टीमसोबत सेटवरील एक झलक शेअर केली आहे आणि त्यासोबत गुड्डू भैय्याने एक नोटही शेअर केली आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

गुड्डू भैय्याने लिहिले आहे की, "मिर्झापूरच्या जगातील सर्व प्रेम आणि मेहनतीबद्दल माझ्या सर्वात प्रिय आणि सर्वोत्कृष्ट टीमला धन्यवाद. सीझन 3 चा प्रवास माझ्यासाठी मागील दोन प्रमाणेच खूप वेगळा आहे. पुढे त्याने सांगितले की तो आणि गुड्डू पंडित शेवटी जे दाखवू शकले ते सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीची मेहनत आहे. संघाचे कौतुक करताना तो म्हणाला, 'तुम्हाला ते जाणवणार नाही, पण तुम्ही सर्वांनी मला किती मदत केली आहे ते मी इथे लिहू शकत नाही. मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी हे वाचले असेल, मी इथे सर्वांना टॅग करू शकत नाही. यावेळी मी माझ्या टीमसाठी वैयक्तिक पत्र लिहू शकलो नाही यासाठी मला माफ करा."

पुढे आपल्या सहकलाकारांविषयी बोलतांना अली म्हणतो, 'माझ्या सहकलाकारांनो, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही बेस्ट आहात आणि मी तुमच्यावर किती प्रेम करतो हेही तुम्हाला माहित आहे. शेवटी Amazon चे आभार आणि या अप्रतिम कार्यक्रमाचं दिग्दर्शन केल्याबद्दल माझ्या गुरूचं आभार"

हेही वाचा: Bigg Boss 16: अख्या घराला बोटावर नाचवणारा शिव आज ढसाढसा रडला! अर्चनाचेही अश्रू अनावर.. कारण ऐकून..

अली फजलच्या या पोस्टला कमेंट करत एका यूजर ने लिहिलयं, "स्पॉइलर च्या नादात मुन्ना भाई ला लपवलं आहे मात्र मुन्ना भैया हा अमर आहे". तर दुसऱ्या यूजर ने लिहिलंय, "आता आम्हाला रिलीज डेट लवकर सांगा". एक यूजर ने कमेंट केलीय, "शूट सपलंय. लवकरच गुड्डू पंडित पुन्हा येणार."

'मिर्झापूर 3' पुढील वर्षी 2023 मध्ये येणार आहे, ज्यामध्ये श्वेता त्रिपाठी आणि अली फजल यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, विजय वर्मा सारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत.