Neetha Shetty: 'गंदी बात' मुळे लोकांनी विचारलं, नाहीतर...

आपल्याकडे ओटीटी माध्यमं ही कोरोनाच्या काळात अधिक सक्रिय झाली. आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला.
Neetha Shetty
Neetha Shetty esakal
Updated on

Entertainment News: आपल्याकडे ओटीटी माध्यमं ही कोरोनाच्या काळात अधिक सक्रिय झाली. आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. याच (Ott News) दरम्यान भारतामध्ये मोठ्या संख्येनं ओटीटी प्लॅटफॉर्म तयार झाले. ओटीटीला सेन्सॉरशिपचे काहीही बंधन नसल्यानं त्यावरुन प्रदर्शित होणारा कंटेट हा प्रेक्षकांना वेगवेगळ्या कारणास्तव भावला देखील. गंदी बात ही अशीच बोल्ड वेबसीरिज. त्या मालिकेवर मोठा वादही झाला होता. ही मालिका दाखविण्यात येऊ (bollywood news) नये अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र या मालिकेला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. तरुणाईची विशेष पसंतीही मालिकेला मिळाली. त्यात नीथा शेट्टीनं प्रमुख साकारली होती.

नीथाचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याविषयीच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. नीथाला जेव्हा गंदी बात सारखी मालिकेवरुन विचारणा (entertainment news) करण्यात आली होती त्यावेळी ती काहीशी विचारात पडली होती. आपण ही मालिका केली आणि त्यामुळे आपल्याला वेगळ्या संकटाला सामोरं तर जावे लागणार नाही ना, आपल्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होईल, घरचे (Neetha Shetty) काय म्हणतील याविषयी चिंता होती. मात्र यासगळ्या प्रश्नांवर नीथानं धाडसानं उत्तर दिलं आहे.

Neetha Shetty
Video: एका 'Donkey Farm'ची गोष्ट !

नीथा म्हणते, मी ही मालिका केली नसती तर मला वर्षानुवर्षे पुन्हा चांगल्या भूमिकेसाठी वाट पाहावी लागली असती. बर ती भूमिका मिळावी यासाठीचा संघर्ष मोठा आहे. मी गंदी बातमधील भूमिका करुन मोकळी झाली ती भूमिका लोकप्रिय झाली. लोकांनी ती आवडली. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे फारसं लक्ष देत नाही. असे नीथानं सांगितलं आहे.

Neetha Shetty
Video: 'दगडी चाळ 2'ही इज बॅक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com