घरट्याचं महत्त्व सांगणारा 'वेलकम होम'; ट्रेलर प्रदर्शित 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 May 2019

घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्यांची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.  

घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्यांची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनय क्षेत्रातील नामांकित कलाकारांची फळी दिसेल.  

चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome Home Marathi Film trailer launched