Katrina Kaif Mehendi कतरिनाच्या हातावर मेहंदीने लिहिला होता असा मजकूर की चढला गडद रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

katrina vicky marraige
Katrina Kaif Mehendi कतरिनाच्या हातावर मेहंदीने लिहिला होता असा मजकूर की चढला गडद रंग

कतरिनाच्या हातावर मेहंदीने लिहिला होता असा मजकूर की चढला गडद रंग

कतरीना कैफ(Katrina Kaif), विकी कौशल (Vicky Kaushal)राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यांपासून, दागिने, लग्नातला मेनू आणि हळदीपासून सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. अनेकांना कतरिनाची मेहंदी खूपच आवडली. कतरिनाला राजस्थानधील जोधपुरच्या पाली जिल्ह्यातून आणलेली खास सेंद्रीय पद्धतीने बनवलेली सोजत मेहंदी लावण्यात होती. त्याची किंमत १ लाख होती.

katrina vicky marraige

katrina vicky marraige

लग्नाचे फोटो प्रसिद्ध झाल्यावर कतरीनाच्या हातावरची डार्क मेहंदी अनेकांच्या लक्षात राहिली. तिची मेहंदी डार्क रंगली होती. रिपब्लिकने प्रकाशित केलेल्या अहवालात कतरिनाने तिच्या हातावर कोणता मजकूर लिहिला होता हे उधड झाले आहे. मेहंदी कलाकाराने रिपब्लिकला सांगितले की कतरिनाने राजस्थानी स्टाईची मेहंदी काढली. तिने मेहंदी काढत असताना हातावर विकी कौशलचे नाव लिहायला सांगितले, असे आर्टिस्टने सांगितले.

हेही वाचा: विकी-कतरिनाच्या हळदीचे खास क्षण

katrina vicky marraige

katrina vicky marraige

मेहंदी काढून झाल्यावर कतरीना खूप आनंदी होती. मेहंदी चांगली काढल्याने तिला आनंद झाला होता. ती लग्नाबद्दलही खूप उत्साही होती, असे मेहंदी काढणाऱ्या कलाकाराने सांगितले. भारतात अनेकजणी मेहंदी काढल्यावर त्यात नवऱ्याचे आद्याक्षर किंवा नाव लिहितात.ही एक मजेशीर गोष्ट आहे. मात्र कतरिनाने हा ट्रेंड फॉलो केल्याने अनेकांना आनंद झाला आहे.

हेही वाचा: Photo | विकी-कॅटच्या लग्नातील खास क्षण

Web Title: What Katrina Kaif Got Written In Her Mehendi Design

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..