कतरिना सलमानच्या प्रेमात असल्याचा आमिरनं घेतला होता फायदा...Katrina Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan,Salman Khan,Katrina Kaif

कतरिना सलमानच्या प्रेमात असल्याचा आमिरनं घेतला होता फायदा...

कतरिना कैफचं(Katrina Kaif) आता विकी कौशलशी लग्न झालंय. छान दोघांचा सुखाचा संसार सुरू झालाय. तुम्ही म्हणाल उगाच कशाला खाजवून खरूज काढल्यासारखं तिचं मागचं उगळून काढणा-या बातम्या करताय. पण वाचकहो,तसं विकीला कतरिना-सलमान मधलं सगळं माहिती तर असणारच. तेव्हा आम्ही त्यांच्या नात्याला काही बाधा येईल असं नक्कीच लिहिणार नाही. पण हा एक मजेदार किस्सा आहे जो आमिरनं(Aamir Khan) सांगितलाय त्याच्या एका मुलाखतीत. तो फक्त इथं सांगावासा वाटतोय इतकंच. आता २०१० साली कतरिनानं एका मुलाखतीत सांगितलं होतं तिच्या आयुष्यात तिनं कोणासोबत सिरीयस रीलेशन ठेवलं असेल तर तो सलमान होता. म्हणजे तिनं थेट प्रेमाची कबुली दिली होती ती ब्रेकअप झाल्यानंतर. म्हणजे सलमान-कतरिना मध्ये प्रेम होतं हे १०० टक्के खरंय. पण आता याच त्यांच्यातल्या नात्याचा फायदा त्यांच्या ब्रेकअपनंतर आमिरनं घेतला होता. तो नेमका कसा?

हेही वाचा: शाहरुखच्या अॅक्टिंगची बायकोनंच उडवली टिंगल!

तर आपल्या सगळ्यांना आमिर उत्तम बुद्धिबळ खेळतो हे माहीत आहे का? हो,आमिर खूप छान हा खेळ खेळतो. संपूर्ण इंडस्ट्रीत ही गोष्ट प्रचलित आहे. कतरिनानंही एकदा त्याच्याबरोबर बुद्धिबळ खेळण्याचे ठरवले होते. तसं तिनं त्याला सांगितलंही. इतकंच नाही तर चॅम्पियन आमिरला तिनं खेळात तुला हरवून दाखविन असं ठसकावून सांगितलं. तिनं चांगली तयारीही केली. महिन्याभरानंतर तिनं आमिरला गेम शिकल्यावर फोन केला. म्हणाली,''आता भेटून आपण एक बुद्धिबळाचा डाव खेळूयाच. जर तू हरलास तर तुला माझ्यासोबत एक सिनेमा करावा लागेल''. पण त्यावर आमिरनं तिला घातलेली अट ऐकाल तर बिचा-या कतरिनाची दयाच येईल आपल्याला.

तो म्हणाला,''ठीक आहे. पण जर तू हरलीस तर तुलाही एक गोष्ट मी सांगेन ती करावी लागेल''. तिने ''कुठली?'' असं विचारताच आमिर म्हणाला,''तुला बान्द्र्यात गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर जाऊन 'दिल चिज है क्या आप मेरी जान लिजिये' हे गाणं मोठमोठ्याने गावं लागेल''. आता बघा,आमिर जितका सरळ-साधा दिसतो तितका नाही हे कळलंच असेल आपल्याला. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर सलमान खान राहतो. म्हणजे आमिरनं पंचाईत केली ना कतरिनाची. नशिब म्हणायचं की हा अटीतटींचा सामान अजून आमिर-कतरिना खेळले नाहीत म्हणून कतरिना वाचली म्हणायची. हा मजेदार किस्सा आमिरनं ज्या मुलाखतीत सांगितलाय तो आम्ही इथे बातमीत जोडत आहोत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top